देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे : हजारोच्या जनसमुदाय लोकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर चळवळीचा नेता हरवला सर्व सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी आमदार वकील नगरसेवक सरपंच यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली सर्व समुदायाच्या उपस्थितीत शेवटचा निरोप देण्यासाठी दोन मिनिट शब्द पाळून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो नतर विधी करण्यात आली,उदगीर विधिज्ञ संघाचे माजी उपाध्यक्ष अॅड विष्णू उत्तमराव लांडगे (वय : ४४ वर्षे) यांचा गुरुवारी (७ मार्च) पहाटेच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी शहरातील मातंग समाज स्मशानभूमी फुलेनगर उदगीर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अॅड विष्णू लांडगे हे आठ दिवसाचा आयोध्या दौऱ्यावर होते. प्रभु श्रीरामाचा दर्शन घेऊन बुधवारीच परतले होते. त्यांचा गुरुवारचा दिवस उजाडण्यापुर्वीच ऱ्हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.या घटनेचे माहिती कळताच महाराष्ट्रातून व इतर राज्यातून फार मोठा समुदाय अंत्यविधीसाठी उपस्थित होता
