फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ज्या राज्याची देशात प्रतिष्ठा आहे त्या महाराष्ट्र राज्यात लोकशाहीच्या नावाखाली मुठभर लोकांची घराणेशाही नांदते आहे....!! सत्तेच्या मस्तीत मुजोर झालेले घराणेशाही वाले तत्व खुंटीला टांगून निवडणूक आली की, इकडून तिकडे कोलांट्याउड्या मारतात, पुरोगामी, पुरोगामी म्हणून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करणारे चक्क प्रतिगामी भाजप सोबतं सत्तेत बसतात...!!
सेक्युलर असल्याचे ढोंग करणारे धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांसोबतं ऊघड ऊघडं घरोबा करतात हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले, सहन केले, अनुभवले आहे आता त्याचा अतिरेक झाला आहे...!! "जातीसाठी माती खा" असा सल्ला देऊन मराठ्यांची मते लाटणा-या मोगलाई मराठ्यांनी गरीब मराठ्यांचे प्रचंड शोषण केले परिणामी त्याला आरक्षण मागण्याची वेळ आली. शेती कसणारा मराठा, कुणबी आत्महत्या करु लागला...!! सत्तेतील माजोर घराणेशाही वाल्यांनी सत्तेसाठी धनगर, मराठा,मुस्लिम या जातींना आरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन कित्येक वर्षे त्यांची सतत फसवणूक केली
.
हा अनुभव महाराष्ट्रातील जनतेच्या गाठीशी आहेचं...!! एका आरक्षण मागणाऱ्या जातीला दुसऱ्या आरक्षणधारी जाती सोबतं भांडतं ठेवायचे कपटी, आणि द्वेषाचे राजकारण, महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले, मराठ्यांना ओबीसी सोबतं, धनगरांना, आदिवासी सोबतं, तर मातंगांना, बौद्धांसोबतं आरक्षणाच्या मुद्यांवर सत्ताधा-यांनी झुंजविले आहे...!! सत्तेतून अमाप संपत्ती कमावणे आणि त्याच संपत्तीच्या ताकदीवर मिडियाला हाताशी धरून, बाजारु विचारवंत,पत्रकार,चाटूकार ,दलाल कामाला लाऊन आपली प्रसिद्धी करतं करतं महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यात हे घराणेशाही वाले आजपर्यंत यशस्वी झाले आहेत...!! अशाप्रकारे मुठभर सत्तेतील घराणेशाही वाल्यांच्या अनैतिक बाबींचा अतिरेक झाला असतांनाच, मनुवादी विचारधारा संविधान संपवायला सरसावली आहे...!!
ज्या संविधानाने मला माणूस म्हणून सन्मान दिला, हक्क आणि अधिकार बहाल केले ते संविधान धोक्यात आहे याची जाणीव ९०% जनतेला झाली आहे आणि म्हणून सुज्ञ माणूस आता सत्तापिपासु, कोलांट्याउड्या मारणा-या, घराणेशाही वाल्या नेत्यांना कंटाळला आहे, जातीच्या राजकारणाने आपला घात केला हेही आरक्षण मागणाऱ्या सर्वच जातीच्या आंदोलकांना कळून चुकले आहे...!! राजकारणात अंधार फार झाला म्हणून महाराष्ट्रातील जनता आता ऊजेड, "प्रकाश" शोधते आहे...!! डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू अॅड .बाळासाहेब आंबेडकर हे गेली ४० वर्षे राजकारण करीत आहेत मात्र त्यांनी कधीही विचारांशी तडजोड करुन खासदारकी, मंत्रीपद मिळविले नाही, मूल्याधिष्ठित राजकारण केले, अनैसर्गिक तडजोड करून सत्तेतील खुर्ची मिळविली नाही आणि गेल्या ४० वर्षात कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरीही प्रतिगामी विचारांच्या राजकीय पक्षासोबत युती किंवा आघाडी सुद्धा केली नाही हा त्यांचा ४० वर्षाचा त्यागाचा आणि वैचारिक प्रामाणिकतेचा इतिहास आहे...!!
वंचित बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी, गरीबांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित रहावे म्हणून परिवर्तनाचा जागर करीत गेली ४० वर्षे अॅड प्रकाश आंबेडकर हे संसाधना अभावी, प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मनुवादी मिडियाच्या विखारी अपप्रचारात आपले मूल्याधिष्ठित राजकारण करीत राहिले, महाराष्ट्रातील जनते पर्यंत त्यांचा आवाज पोहचतं नव्हता कारण प्रचार प्रसाराचे कुठलेच साधणं हाताशी नव्हते, लाखा लाखाच्या सभा घेऊनही मिडिया दखल घेत नाही कारण मिडिया प्रस्थापितांच्या हातात आहे...!! आता सोशल मीडिया आला आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दरदिवशी जनतेला कळू लागली, त्याचा परिणाम असा झाला की, महाराष्ट्रातील जातीच्या आणि धर्माच्या भिंती ओलांडून संविधानवादी सुज्ञ माणसांना, प्रचारकांना हभप महाराजांना,किर्तनकार महाराजांना,संपादकांना,जेष्ठ पत्रकारांना अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मधला वैचारिक राजकीय पुढारी समजू लागला आहे...!! महाराष्ट्राला प्रकाशमान करणारं नेतृत्व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विचारवंतांना सापडले आहे आणि त्या नेतृत्वाचा प्रचार ते स्वतः होऊन करीत आहेत...!! अॅड . प्रकाश आंबेडकर यांच्या कडे सत्ता नाही, तशी संपत्ती सुद्धा नाही मग मिडिया कोठून ऊभा करणार.?परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सत्य किती दिवस झाकून ठेवणारं.? ते एक दिवस जनते समोर येतेचं. कोंबडं झाकून ठेवल्याने दिवस ऊजाडायचा थाबतं नाही तसेच झाले आहे...!!
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे स्वतः आपल्या युट्युब चॅनलवरुन महाराष्ट्रातील सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना आवाहन करुन सांगतं आहेत की, वंचित बहुजन आघाडीला सोबतं घेतल्या शिवाय भाजपला पराभूत करता येत नाही. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय ताकद दुर्लक्षित करुन चालतं नाही...!! मॉ साहेब जिजाऊ चे वंशज मा. नामदेवराव जाधव ज्यांनी १२ लाख मराठी तरुणांना उद्योजक बनविण्याचा संकल्प केला आहे ते मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून सांगतं आहेत की,
महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून देण्याची वैचारिक ताकद प्रकाश आंबेडकर यांच्या कडे आहे, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनविले पाहिजे ही काळाची गरज आहे, ते आरक्षणवादी आहेत तेच गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात...!! औरंगाबाद (संभाजी नगर) लोकमतचे संपादक श्री. नंदकिशोर पाटिल हे आपली लेखणी झिजवून संपादकीय लिहून सांगतं आहेत की संसदेत कॉंग्रेस पक्षाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना सोबतं घ्यावेच लागेल....!! प्रा. कांगणे सर महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना आवाहन करीत आहे
त.
प्रचार करीत आहेत की,वंचित बहुजन समाजाला न्याय मिळवून देणारं महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचेच आहे...!! किर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे अतिशय आदराने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची तुलना शिलवंत, गुणवंत अशा विशेषणाने करीत विठाई म्हणून त्यांच्या बद्दलचा आदरभाव व्यक्त करतात...!! हभप नितीन महाराज पिसाळ हे महाराष्ट्रातील जनतेला दरदिवशी एक व्हिडिओ बनवून सांगत आहेत की, प्रकाश आंबेडकर साहेब हे बुद्धीमान नेतृत्व आहे, सर्वसमावेशक दृष्टीकोन असणारं नेतृत्व आहे, आरक्षणवादी नेतृत्व आहे आणि राजकारणात अंधार फार झाला आहे, महाराष्ट्राला आता ऊजेडाची अर्थात प्रकाशाची गरज आहे,आणि तो "प्रकाश" डॉ.बाबासाहेब आंबेडकराचा नातू प्रकाश आंबेडकर आहेत...!! राजकीय क्षेत्र वगळून वेगवेगळ्या क्षेत्रातील संवेदनशील विचारांचे वरील मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासु आणि बुद्धीमान नेतृत्वासाठी प्रचारक बनले आहेत हे कशाचे लक्षणं आहे.?
हा समाज मनाचा आरसा आहे, महाराष्ट्रातील समाज अंधार फार झाला म्हणून “प्रकाश ” शोधतं आहेत आणि त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवामध्ये “प्रकाश” दिसतो आहे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.