

मानवी हक्क अभियान संघटनेला आले यश
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी हजारो वर्षापासुन विशिष्ट जात समुह सर्वंच साधन संपत्ती पासुन वंचित आसुन जीवन जगण्यासाठीची साधने तर त्यांचेकडे नाहीत,परंतु मृत्यू नंतर त्यांच्या अंत्यविधी साठी सुध्दा जागा नाही,दलितांची स्वातंत्र्य पुर्वीची अवस्था तीच अवस्था स्वातंत्र्य नंतर आज ही पहावयास मिळते,याच परिस्थीत पांढरवाडीचे दलित जीवन जगत आहेत.लातुर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या पांढरवाडी येथे दलितांच्या वाहिवटीत आसलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी साठी विरोध केला जात होता तर,दलित स्मशानभूमी त्या़च्या हक्काची नसल्यामुळे कोणत्याही दलित मयतांचा अंत्यसंस्कार वादात आणि तणावातचं करावं. लागायचं,मात्र काही दिवसांपूर्वी दलित व्यक्तीच्या अंत्यविधी साठी मज्जाव करण्यात आल्याने येथील दलितांनी मयतांचा अंत्यविधी रस्त्यावर केले आणि ही बातमी मानवी हक्क अभियानाचे लातुर जि.उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांना समजली,त्यांनी तत्काळ घटनेची माहिती मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा सचिव मारुती गुंडीले यांच्याशी विचार विनिमय करुन त्यांनी व त्यांच्या टीमने पांढरवाडी येथील दलितांना तत्काळ स्मशानभूमीची व्यवस्था करुन द्यावे अन्यथा आभियांनाच्या संविधानिक संघर्षात्मक लढ्याला समोरे जावे लागेल असे आव्हान प्रशासनास दिले,या आव्हानाची बातमी प्रसिद्धीस आल्याने मानवी हक्क अभियानाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ गायकवाड यांनी लक्ष्मण रणदिवे यांच्याशी संवाद साधुन या कार्याला समर्थन दिले व पाठिंबा दर्शविले व याबाबत आवश्यक ती माहिती घेऊन हे प्रकरण कैलास गायकवाड यांनी मंत्रालयात लावुन धरले या प्रकरणी ग्रासरुटटसवर लढा देणारे लक्ष्मण रणदिवे व मंत्रालयात पाठपुरावा चालविणारे कैलास गायकवाड यांच्या या मागणी रेट्यामुळे मुळे स्थानिक प्रशासनाने तत्काळ कार्यवाही चालविली असुन या गावात तहसिलदार शिरुर अनंतपाळ यांचे मार्फत स्मशानभूमीच्या जागेसाठी भुसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे,ही मागणी लावून धरण्याकामात लक्ष्मण रणदिवे यांच्या मागणीला मानवी हक्क अभियान संघटनेचे गजानन गायकवाड,डि.एन.कांबळे,अनिल घोडके,हरिभाऊ राठोड, अश्विनी वाघमारे,मीना वाघमारे,तानाजी वाघमारे,यांनी समर्थन देऊन पाठिंबा दिले होते या यशामुळे या सर्वांचे आभियांनाच्या परिवाराकडून कौतुक केले जात असुन सामाजिक स्तरावर या यशामुळे आनंद व्यक्त केला जात आहे,