— डॉ चव्हाण


दिनांक २२ फेब्रुवारी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक अडचणीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले.जगातील सर्वश्रेष्ठ संविधान त्यांनी लिहिले जगातील १४० राष्ट्रांत त्यांची जयंती साजरी केली जाते .
ते विश्वरुपी व्यक्तीमत्व होते
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आज नसते तर आपले काय झाले असते?
मनुस्मृतीचे दहन केले आणि देशाचे संविधानही लिहिले ते भारत भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांने अभ्यास करावा अभ्यास केल्यामुळेच विद्यार्थी यशाच्या शिखरावर विराजमान होतो. स्नेहल बार्टी ग्रंथालयातील विद्यार्थीनी असुन तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिक्षेत उत्तीर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून मा. विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या हस्ते स्नेहल फोंडे या विद्यार्थीनीला भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन सन्मान करण्यात आले.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी बार्टी ग्रंथालयातील विद्यार्थीनी कु स्नेहल फोंडे
(पोलिस पिंपरी चिंचवड) यांची भारतीय खाद्य निगम मध्ये सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झालेली आहे.
स्नेहल हिने सतत ३ वर्षं बार्टी संस्थेच्या ग्रंथालयात अभ्यास करून हे यश संपादित केले आहे सुरुवातीस स्नेहलच्या हस्ते
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना स्नेहलने डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने अहोरात्र अभ्यास करून या देशाला संविधान दिले त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आम्हा महिलांना न्याय मिळाला हे नमूद केले.
बार्टी संस्थेत अभ्यास करतांना ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले, विद्यार्थी, बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले त्यामुळेच आज मी यशस्वी झाली असल्याचे सांगून बार्टीचे आभार मानले.
याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, स्थावर अभियंता श्रीहारी कोकरे, उप अभियंता राजेंद्र वाबळे, प्रकल्प अधिकारी सुंनदाताई गायकवाड, तेजस्विनी सोनवणे, संजिव कटके, यश कांबळे, सचिन नांदेडकर ग्रंथपाल विनायक भालेराव, वैशाली खांडेकर, राहुल कवडे, गौरी वाघमारे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले.