अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाचे यश

उदगीर: येथील अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी 2023 मध्ये विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालाची उज्वल परंपरा कायम राखून 98.11% निकाल देत यश संपादन केले आहे.
विद्यालयातर्फे विज्ञान शाखेतून 53 विद्यार्थी परीक्षेकरिता बसले होते. त्यापैकी 04 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 34 विद्यार्थी द्वितीय व 14 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 98.18 टक्के लागला आहे.
कला शाखेतून 46 विद्यार्थी परीक्षेकरिता बसले होते. त्यापैकी चार विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 19 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 09 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अशा प्रकारे कला शाखेचा निकाल 93.47 टक्के लागला आहे.
कला शाखेतून गोलंदाज जवेरिया ज़ियाउल हक़ या विद्यार्थिनीने ८२.३३ टक्के गुण घेऊन विद्यालयात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. 79.83% गुण घेऊन ज़रगर सादिया बेगम साजिद ही विद्यार्थिनी द्वितीय आली आहे. यशफ़ीन जेवरिया मो. मोहियोद्दीन या विद्यार्थिनीने 77. 83% गुण घेऊन विद्यालयात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे तर तंबोली उम्मे रज़ीया या विद्यार्थिनीने 75.67% गुण मिळविले आहेत.
विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य शेख मुंतजीबोद्दीन, अल-अमीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉ ईसा खान साहेब व सचिव माननीय शेख अकबर साहेब तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp