अवैध धंदे करणासाठी अनाधिकृपणे प्रेस, पोलिस, आर्मी, वकील, डॉ्नटर असे नावे टाकणार्या वाहनासह कर्कश आवाज
करणार्या बुलेटवरही कार्यवाही करा
-विद्रोही पत्रकार संघाची मागणी
उदगीर(प्रतिनिधी)-शहर व तालु्नयात मोटारसायकलीचा सुळसुळाट होत असून सामान्य नागरीकांचे वाहने सार्वजनिक ठिकाणाहून चोरीला जात आहेत तरी याचा पत्ता लागत नाही. याच सोबत उदगीर शहर व तालु्नयात विभागीय दैनाकिचे प्रतिनिधी तसेच स्थानिक दैनिक ,साप्ताहिक, न्यूज
चॅनलचे संपादक/प्रतिनिधी असून त्यांच्या स्वत:च्या दुचा्नया व वाहन आहेत तसेच पोलिस, वकील,डॉ्नटर, आर्मींच्याही दुचा्नया आहेत. पण या व्यतिरिक्त शेकडोच्यावर दुचा्नयावर सदरील नावे टाकून गैर वापर होत असून अवैध धंदे जोमाने सुरु आहेत यामुळे पोलिस प्रशासनास सदरील नावे निदर्शनास आल्यावरही त्यांची बर्याच प्रमाणात तपासणी करण्यात येत नाही. दिवसा, रात्री अपरात्री वेगवेगळ्या कामासाठी विशेष
प्रेस व पोलिस या नावाने फिरणार्या मोटार सायकली व वाहन कांही विशेष लोक आपला गोरख धंदा चालवत आहेत यामुळे खर्या पत्रकरांना याचा त्रास होत आहे. पोलिस व पत्रकारांच्या वतीने अनोळखी प्रेस लिलेल्या वाहन चालकास विचारणा केल्यास पळून जातात किंवा उध्दटपणे
वागतात व विशिष्ट समाजाच्या लोकांना जमा करतात. यामुळे असे प्रकार थांबणे आवश्यक आहे.
याच सोबत कांही मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर नंबर न टाकता दादा,भाऊ, सरपंच किंवा महापुरुषांचे नावे, चित्र टाकून फिरत आहेत. तर बुलटचेही प्रमाण वाढले असून सार्वजनिक ठिकाणी, लोकवस्ती परीसरात,शाळा, कॉलेज, हॉस्पीटल,मार्केट आदी ठिकाणी हे बुलटस्वार विविध मोठ्या व कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून आवाज करत वेड्यावाकड्या वळणाने पळत असतात यामुळे या आवाजाचा परीणाम होतो.
तरी संपादकाच्या स्वत: गाड्या व्यतिरिक्त प्रतिनिधीचे आय कार्ड असेल किंवा नसेल त्यांची
चौकशी करून तो प्रतिनिधी आहे का हे संबंधीत संपादकाशी चौकशी करूनच त्यास कार्यवाहीपासून मुक्त करावे. दैनिकाचे तालुका,शहर व ग्रामीण असे प्रतिनिधी असतात तर साप्तिहिकाचे संपादक,उपसंपादक,कार्यकारी संपादक व एक प्रतिनिधी असतो यामुळे एका वृत्तपत्राचे किती प्रतिनिधी आहेत याचीही चौकशी करावी अन्यथा सदरील
मोटारसायकलवर कार्यवाही करून तात्काळ प्रेस,पोलिस, आर्मी, वकील,भाऊ,दादा,सरपंच आदी नावे काढून टकाण्यात यावे व बुलेटचे सायलेन्सर बदलण्यास भाग पाडावे असे विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारीसह शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.हे निवेदन विद्रोही पत्रकार संघाच्यावतीने
अध्यक्ष तथा दै./सा. व यू ट्युब चॅनल एकजूट लोकजागृतीचे संपादक महादेव घोणे, उपाध्यक्ष तथा सा.सीमावार्ता टाईम्सचे संपादक राम जाधव, सचिव तथा सा.प्रजापक्राशचे मुख्य संपादक अॅड.श्रावण माने व कार्याध्यक्ष तथा संपादक विश्वनाथ गायकवाड यांनी दिले आहे.