आज महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय पक्षांची ध्येय धोरण उद्दिष्टे बासनात गुंडाळून आपल्या सोयीनुसार राजकीय वाटचाल करीत असताना दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कोणाचा समर्थक कोण कोणाचा विरोधक हा विषयच राहिला नाही भारतीय जनता पक्षाने सोईनुसार ईडी सारख्या शासकीय यंत्रणेचा वापर करून धाक दाखवून किंवा विविध प्रकारचे अमिश दाखवून प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा घाट घातला आहे दिवसेंदिवस एक एक प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागत आहेत इडी सारख्या प्रशासकीय यंत्रणा सत्तेच्या गुलाम झाल्यामुळे प्रादेशिक पक्षाचे लोकशाहीतील मूल्य हिरावून घेतले जात आहेत लोकशाहीसह प्रादेशिक पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत लोकशाही मूल्य पायधुळी तुडविणाऱ्या राजकिय पक्षाला जशास तसे उत्तर देण्यासाठी देशाला वंचित बहुजन आघाडीची गरज निर्माण झाली आहे शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वारसा सांगून महाराष्ट्रात सत्तेसाठी लोकांना मूर्ख बनविणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसाठी तोंडघशी पडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नेमकी भूमिका काय हा सद्या तरी चर्चेचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडणं भाजप शिंदे सरकारसोबत जाण ही काही साधीसुधी राजकीय घडामोडी नाही हे शरद पवारांना माहिती नसणं हे शक्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपा सोबत जाऊन शिंदे सरकारचा काटा काढणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध प्रकारच्या आरोप प्रत्यारोप पात अडकलेल्या नेत्यांना भाजपात जाऊन त्यांना क्लीन चिट देऊन पुन्हा 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सक्षमपणे निवडणुकात उतरविणे असाही उद्देश असू शकतो मागे पहाटेच्या शपथविधी मध्ये हेच झाले आहे दुपारच्या सत्रात झालेल्या शपथविधीत असेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही नऊ दहा आमदारावर टांगती तलवार आहे ह्या आमदारांचा निकाल तात्काळ येईल मुख्यमंत्री शिंदे सरकारला पायउतार व्हावे लागेल जसेच्या तसे राष्ट्रवादीचे आमदार भारतीय जनता पक्षासोबत राहतील संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राला दुसरा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून मिळेल शिंदे गटाला मजबूर करून अलगत बाजुला केले जाईल असे काहीही समीकरणे राजकारणात होऊ शकतात काल झालेल्या महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाने दाखवून दिले आहे राजकारणात कोण कोणाचा मित्र व कोण कोणाचा शत्रू असू शकत नाही हे दाखवून दिले आहे सत्तेसाठी साटलोट हेच खरं राजकिय समीकरण आहे पाच वर्षाच्या कालावधीत कोणत्याच राजकीय पक्षाने महागाई बेरोजगारी,विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही अनेक उद्योग धंदे दिवसाढवळ्या गुजरातला पळविले गेले देशातील 70 वर्षात काँग्रेस पक्षाने उभे केलेले उद्योग धंदे खाजगीकरनांच्या नावाखाली सर्रासपणे विक्रीला काढून विकली जात आहेत विरोधी पक्षांतील एखाद्या लोकप्रतिनिधीनी विरोध केला की त्यांच्या मागे ईडी सारख्या यंत्रणा लावत आहेत अश्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकला संपविण्याचे कट कारस्थान चालू आहे सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे लोकहिताचाअजेंडा लोकांच्यापुढे घेऊन जाण्यासाठी मुद्दा राहिला नाही आयत्या वेळी समान नागरी कायदा व राममंदिर यांचे लोकार्पण हा मुद्याच्या आधारे लोकांसमोर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकांना मूर्ख बनवून लोकांच्या देवदेवतांच्या नावाखाली जातीय वाद धर्मवाद यांच्यात लोकांना गुरफटून ठेवलं जातं आहे लोकांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करून सत्ता हस्तगत करणे हा एकमेव पर्याय यांच्याकडे आहे यात संपूर्ण बहुजन समाज भरडला जात आहे सर्व जातीय धर्माच्या पलीकडे जाऊन मा ऍड प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तमाम बहुजन समाजाला सक्षम पर्याय दिला आहे या पर्यायाला तात्काळ स्वीकारले नाही तर फुले शाहू आंबेडकरी विचार सांगणारा एकही पक्ष देशात राहिला नाही पक्षाचे ध्येय धोरण राहिले नाहीत सर्वसामान्य लोकांना मनुवाद व गुलामगिरी कडे कसे घेऊन जाता येईल त्यांच्यावर मनुवाद कसा लादता येईल एकमेव प्रयत्न केला जात आहे तमाम बहुजन बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष सापनाथ तर काँग्रेस पक्ष नागनाथ आहे हे दोन्ही चावणारेच आहेत प्रादेशिक पक्ष दोनतोंडी महाडोळ यांच्या भूमिकेत आहेत तमाम 85%बहुजन समाजाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही हे कटू सत्य आहे
–गिरीधर गायकवाड
