आज महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्र मध्ये 1994 ते 1998 पर्यंत अंशकालीन पदवीधर म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी काम केलं त्यांना आज पर्यंत कुठेही अनुदान मिळत नाही तसेच आज तागायत इतकी सुशिक्षितांची बेकारी वाढलेली आहे क्रीडा क्षेत्रा असो वैद्यकीय क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्रात असो महाराष्ट्रामध्ये सरकारी व निमसरकारी क्षेत्रामध्ये बऱ्याच जागा व्याखंड आहेत आज महाराष्ट्र मध्ये बरेच विद्यार्थी सुशिक्षित बेकार म्हणून बऱ्याच ठिकाणी काम करून त्यांचे वय आज 58 ला येत आहे तरी पण त्यांना नोकरी मिळत नाही त्याचे काय हो सरकार शासनाने घरकुल याद्या मतदान याद्या असे बरेच कामे पदवीधर विद्यार्थ्यांकडून करून घेतले त्यांचा आजपर्यंत मोबदला मिळालेला नाही साक्षरता अभियान असेल कुठले काम करण्यासाठी आज सुशिक्षित बेकार रस्त्यावर उभा आहे त्यांना कामे द्या काम केलेल्या मजुरांना रोजगार द्या हीच आमची तरुणाची मागणी आहे तरुण बेरोजगार आज इतर ठिकाणी भरकटत आहे त्यांच्या हाताला काम नाही आज कुठली भरती निघो, लाखोर विद्यार्थ्यांची नोंदणी होते पण विद्यार्थ्यांचे भरती केली जात नाही म्हणून आमचे मायबाप सरकार केंद्र असेल राज्य असेल कोणी पक्षाचे असेल आम्हा सुशिक्षित बेरोजगारांना पक्षाची जरुरत नाही आम्हाला दोन टायमांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था करा आम्ही कुठे राहू कुठेही काम करू आम्हाला रोजगार मिळाला पाहिजेत ही त्या पदवीधर विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची केविलवाणी गोष्ट आहे हो आमचे मायबाप सरकार सरकारला आमची एक नंबरची विनंती आहे विद्यार्थ्यांचे कॉलिटी बघा विद्यार्थ्यांचे शिक्षण बघा आणि ज्या त्या शिक्षणामध्ये त्या त्या वर्गावर पदवीधर विद्यार्थ्यांना हाताला काम द्या प्रत्येक क्षेत्रात बेकारी वाढली आहे आमचा पदवीधर 10000 हजारापासून तुम्ही किती पैसे दिलेत तर काम करण्यास तयार आहे असे मी सुद्धा एक पदवीधर आहे म्हणून सर्व पत्रकारांना माझी नम्रतेची विनंती आहे आपला भाऊ काका बहीण आई-वडील स्वतः पत्रकार सुद्धा बेकारी मध्ये असाल ही बातमी सर्व पत्रकारांनी आपल्या आपल्या पेपरला प्रसिद्ध करावे ही आमची नम्र विनंती

आपला नम्र

डॉक्टर रामचंद्र भांगे

अखिल भारतीय मराठा महासंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp