बाबा…. आज लिहिते एक लेक तुमची…
आज बोलते एक लेक तुमची…
आज गणली जाते माणसात हि लेक तुमची…
खरचं. तुमच्यामुळेच शक्य झाली मोजणं हि उंची….
बाबा, किती कष्ट साहिले तूम्ही…
वाचावं म्हंटल , तर वाचतानाही अश्रूच थांबले नाहीत..
जाणवला तो त्रास…
तुम्ही सोबत असल्याचा सारखाच असतो भास…
कसं विसरु बाबा… तुमचे परोपकार…
त्रास होतो जेंव्हा, लोक करतात तुमच्या विचारांना नकार…
बाबा, त्रास.. अश्रू.. दुःख.. जाणवत आतून…
जेव्हा कळतं कि.. तुम्ही आज नाहीयेत…
रोज सांगते स्वतःला.. बाबा आहेत इथेच..
पण आजुबाजूच वातावरण पाहून कळतं..
की हळूहळू सर्व हरवतय कुठेच….
आधीपेक्षा आज थोडा बदल आलाय बाबा..
घ्यायला शिकलेत लोक विचारांचा ताबा..
पण, कुठतरी थांबलय सगळ जातीत…
काय महिती, जात कशाला… जर शेवटी जाणार सर्वच मातीत…??
त्या भिमाई – रामजींनी तुम्हाला घडवलं…
कसं विसरु बाबा…
तुम्हाला त्रासाने किती रडवल….?
तरीही थांबला नाहीत बाबा, मनात बुद्ध दडवल…
खरचं सोपं न्हवत, घरोघरी विचार मडवण …
तुम्ही म्हणालात,
जो इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही…
पण बाबा, महापुरुष नेमके कोण आम्हाला हेच आठवत नाही..
यापेक्षा मोठ दुर्दैव काय असणार भिमा….
आमच्या वागण्याला उरल्याच नाहीत आता सीमा….
सुधरण्याचा प्रयत्नही करतो बाबा आम्ही..
आज आणि रोज ठरवतो.. करू नक्कीच…
पण वाटलं न्हवत बाबा… माणसांपेक्षा जास्त…फोन असेल पक्की….
चूक सुधरवू… वाटत नेहमी..
पण बाबा…. चूक चूक वाटतच नाही…
कारण.. वाटतं सर्वाँना मी-माझं श्रेष्ठपण….
कशी येईल बाबा मग मनात दडपण….
तुम्ही वर्गाच्या बाहेर बसून शिकलात…
आम्ही वर्गात बसून इतर गोष्टींची करतो बात…
बघा ना बाबा.. किती आलोय आम्ही पुढे…
बनून राहिलोय फक्त जिवंत मडे…
बाबा.. तुम्ही स्त्रियांसाठी खुप केले…
पण ते आम्ही नवसाने मिळवले असे वाटले…
खरतर.. होते तुमचे कष्ट…
पण आमची बुद्धी झालिये भ्रष्ट…
हिंदू कोड बिल देऊन..दिले सर्व अधिकार…
त्यामुळेच तर धावतो आम्ही मोकर…
तुमचा मंत्रिपदाचा त्याग एकदाही का आठवत नाही….
म्हणूनच अंधकार आहे..दिशा दाही..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणल् की खुप ऊर्जा भरते.. पण कळत नाही काही वेळातच का सरते…?
तुमचा एवढा त्याग असूनही.. आमच्या मनी कमी भावना का उरते?
असच दिशाहीन होऊन रोज एक शरीर झुरते…..
माहिती नाही बाबा.. अजून कधी करणार आम्ही स्वतःसाठी संघर्ष…
आणि भरणार खोटं सोडून खर हर्ष…
जाणीव झाली नाही पूर्ण अजून… रमाई- बाबांनी दिली किती वर्ष…
अजून शिकायचं बाकी आहे.. अंतर मनाचा स्पर्श….
बाबा…. आज लिहिते एक लेक तुमची…
आज बोलते एक लेक तुमची…
आज गणली जाते माणसात हि लेक तुमची…
खरचं. तुमच्यामुळेच शक्य झाली मोजणं हि उंची…. -
प्राजक्ता पांडुरंग कलंबरकर