मतदारांचा संभ्रम दूर..काँग्रेसचा उमेदवार ठरला..!!

देवणी / प्रतिनिधी : होऊ घातलेल्या निलंगा विधानसभा निवडणुकीत गेल्या सहा महिण्यापासून चालू आसलेला सस्पेन्स थ्रिलर आज शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीच्या पत्रामुळे क्लिअर झाल्याने कार्यकर्ते एकबारचे निश्वास सोडला आहे. त्यामुळे निलंगा विधानसभेसाठी सर्व सामान्य कार्यकर्ते आसलेल्या अभय साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस पक्षातील सामान्य माणसाला एक प्रकारे उर्जा निर्माण झाले आसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

निलंगा विधानसभा निवडणुकीत कोणाची दिशा आणी कोणाची दशा ठरणार.! हे मतदारांवर आवलंबून आसणार आहे.मतदारसंघातील नवनवीन आपडेटसाठी वाचत रहा अग्रो इंडिया व्रत्तपत्र…