
उदगीर ते देवणी मार्गे पुणे बस सेवा सुरू
देवणी प्रतिनिधी
उदगीर आगाराची बस रविवारी सकाळी देवणी बसस्थानकात आली असता बसला हार घालून व नारळ फोडून भाजपा जेष्ठ नेते हावगिराव पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली ,यावेळी देवणी वाहतूक नियंत्रक भानुदास म्हेत्रे, गणेश घाळे,पेंटर बंडेप्पा होनमाने,बसवराज बिरादार नेकणाळ, जिंकलवाड जगदिश, कुली शंकर कांबळे, आदीसह नागरिक प्रवासी उपस्थित होते,उदगीर देवणी मार्गे पुणे ही बस रविवार पासून सुरू करण्यात आली आहे ही बस उदगीर वरून सकाळी 6 वाजून तीस मिनिटांनी सुटेल व देवणी बस स्टँड वर 7 वाजता पोहचेल या गाडीचा मार्ग वलांडी, साकोळ,बाभळगाव मार्गे लातूर बार्शी इंदापूर मार्गे पुणे असा असेल, परत हीच बस पुणे येथून सकाळी 6 वाजता उदगीर कडे निघणार असल्याचे देवणी वाहतूक नियंत्रक भानुदास म्हेत्रे यांनी सांगितले, ऐन दीपावली सणामध्ये ही बस सेवा चालू केल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे