लेंडी धरण संघर्ष समितीच्या साखळी उपोषणास युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष अण्णा बोनलेवाड व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट.

मुखेड / प्रतिनिधी : मुक्रमाबाद भागातील आंतरराज्य लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्क मागण्यासाठी शासनाने संपादीत केलेली २३३१ हेक्टर जमीनीस २०१३ च्या कायदयानुसार अनुदान अदा करण्यात यावे व हेक्टरी २५ लक्ष रु.पॅकेज शासनाने घोषीत करावे किंवा शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमीनी परत मिळाव्यात यासाठी लेंढी धरणावर गेल्या कित्येक दिवसापासुन शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात ११ गावातील शेतकरी व नागरीकांनी साखळी उपोषणाच्या मार्गाने कोळनुर गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करीत असताना मुखेड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला.
या आंदोलकांच्या मागण्या गांभिर्याने घेऊन तात्काळ निकाली काढावेत व न्याय दयावा अन्यथा पुढील काळात होणारे आंदोलन हे तिव्र होणार असुन आंदोलकांच्या व गावकऱ्यांच्या पाठीशी मुखेड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोषअण्णा बोनलेवाड यांनी केले.
यावेळी लेंडी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मुखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर,सचिव उमाकांत वाकोडे सर भिंगोलीकर,मुखेड काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,महाराष्ट्र सेवादल कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अण्णासाहेब जाहीरे,जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाश पाटील उन्द्रीकर,चंद्रशेखर पाटील,कोळनुर गावचे आज रोजीचे आंदोलनकर्ते शेतकरी व नागरीक अजित देशमुख,वैजनाथ अण्पा तिपणे,नागेश बालाजीराव पाटील,हणमंत रावसाहेब चव्हाण,व्यंकटराव देशमुख,दिपक देशमुख,निळकंठ पाटील,नारायण पाटील,सुर्यकांत कोळनुरकर सह शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.



