कर्तृत्व हे काही माणसांच्या नावातच असते त्या कर्तृत्वाने केवळ ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबच नाही तर सभोवतालचा परिसरही उत्तुंग होतो अशाच कार्यशील नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा त्यांच्या कार्याचा जन्मदिनी घेतलेला आढावा.
कायद्याचे अभ्यासक, पत्रकार आणि समाजसेवक अशा तीन वेगवगळ्या जबाबदा-या सांभाळणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते ते ॲड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे यांचा आज जन्मदिवस…

वाचनाची आवड लहानपणीच लागल्यामुळे त्या वाचनातून मिळालेल्या आणि भावलेल्या तत्वांच्या ओढीन त्यांनी आपल्या तिन्ही क्षेत्रांतील प्रवासाला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे शालेय शिक्षण घेतांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागला महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाही आर्थिक अडचणीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मुळातच बुद्धिमान आणि हुशार असल्याने त्यांच्या स्वभावाचे अनेक वेगवेगळे पैलू पहायला मिळतात.यासोबतच त्यांनी 'दै.लोकपत्र', गाववाला, लोकनायक व अकोला दर्शन या दैनिकातून, नियतकालकांमधून समाजातील प्रश्नांची अडीअडणीनीची अतीशय तर्कशुद्ध मांडणी आपल्या विपुल लेखणीतून केली. करीत आहेत. त्यांनी पत्रकारितेतून विविध सामाजिक लोकहिताची प्रकरणे प्रकाशात आणली ते अजूनही लोकांचे प्रश्न शासन दरबारी मांडत आहेत. रस्ते, विज, आणि पाणी या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर त्यांचे वास्तववादी लेखन आदर्शवत आहे.जातपात कर्मकांड अनिष्ट रूढी परंपरा यावर ते आपल्या लेखणीतून सातत्याने प्रहार करीत असतात. लोकांच्या मनावरील बेगडी अंधश्रध्देचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे लोकांच्या भावना संवेदना उदार झाल्या पाहिजेत असा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी पत्रकारिता करीत लोकशाही जोपासत ते नेहमीच अग्रेसर आहेत या निर्भिड पत्रकारितेमुळे
ह्युमन राईट्सचा उत्कृष्ट पत्रकरिता पुरस्कार, मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार अशा विविध पत्रकार संघटना व सामाजिक संघटनेकडून ते सन्मानित आहेत. त्यांचा सन्मान केला जातो. त्याचे लेखन पाहिलं वाचलं तर एकविसाव्या शतकातील ऐतिहासिक साक्ष वाटावा एवढा सर्व पातळीवरचा सर्व प्रवाहातला यशस्वी अभ्यासू मानदंड म्हणून हेवा वाटतो.
प्रत्येकाच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात काही त्यावर मात करतात तर काही त्यापुढे शरणागती पत्कारतात परंतू त्या संकटापुढे हतबल न होता उलट आव्हान समजून त्यावर जे प्रहार करतात त्यांचीच आज इतिहासात नोंद केली जाते त्यापैकी ॲड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे हे एक बहुआयामी वयक्तिमत्त्व आहे. यांचा जन्म १० जानेवारी रोजी शिरूर दबडे ता. मुखेड जिल्हा नांदेड येथे झाला चेअरमन गोविंदराव भद्रे त्यांचे वडिल तर लक्ष्मीबाई गोविंदराव भद्रे या त्यांच्या मातोश्री होत. वाचनाची आवड असल्याने लहान वयातच तथागत सिद्धार्थ गौतम बुध्द, फुले, शाहु, शिवराय, आंबेडकर यांची आत्मचरित्र, ग्रंथसंपदा वाचून काढली या महापुरुषांच्या विचाराने प्रेरीत झाल्यामुळे कायद्याच्या अभ्यासासोबत वरील महापुरुषांना अभिप्रेत असलेला समाजसेवेचा वारसा जोपासत आहेत. ते केवळ ॲडव्होकेट किंवा पत्रकार नसून कर्ते किर्याशील समाजसेवक समाजसुधारक म्हणून परिचीत आहेत. घरची परिस्थिती आणि कोणतीही पार्श्वभूमी नसतांना समाजहित दूरदृष्टी जोपासत कासा मनुष्यबळ विकास संस्थेतर्गत ग्रामीण विकास कार्यकर्ता परिषदेमार्फत सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेत गोर - गरीब, युवक युवती कामगार, कष्टकरी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र झटताना कित्येक वेळा दिसून आले. याच कामाची पोचपावती पाहता गांधी - आंबेडकर संघटना जिल्हा संपर्क प्रमुख,तंटामुक्ती निर्मूलन समिती जिल्हा सदस्य
नेहरू युवा केन्द्र मार्फत कित्येक पुरस्कार प्राप्त आहेत. वयोवृद्ध ज्येष्ठ – श्रेष्ठ व इतर अनेकांनी त्यांना
केलेल्या कामाप्रती समाधानी होवून ‘साहेब’ ही उपाधी दिली तरीही कायम सामाजिक चळवळीचे भान ठेवून आपण ज्या समाजाचा हिस्सा आहोत. त्या किंवा ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलेही काही उत्तरदायित्व आहे. या सर्वसाधारण भूमिकेतून आणि विचारातून वरील सगळ्या गोष्टी यांच्या हातून घडत असतात हिच त्यांच्या विचारांची आचारांची प्रगल्भता आहे. कारण अधिकाधिक चांगल्या गुणी माणसांच्या यादीत हे नाव नक्कीच अग्रेसर असेल. समजसेवा आपल्या हातून घडावी म्हणून मदतीचा हात सदैव पुढे करणारा हा माणूस बहुविद्द्य पैलूंचा साक्षात हिराच म्हणावा लागेल. अशा मोठ्या मनाच्या माणसानी सामाजिक जबादारीच्या जाणिवेतून वेळोवेळी मोर्चे आंदोलनातून न्यायासाठी झगडताना पाहिले याच एकोप्याचा भावनेतून सामाजिक क्षेत्रात अंत्यंत कर्तबगार कुशल नेतृत्व म्हणून ते उदयास आले.
नांदेड जिल्यातील मुखेड तालुक्यात लोकजागृती सामाजिक/ सांस्कृतिक/ शैक्षणिक/ पुरोगामी विचारमंच संस्थेची स्थापना केली. या सामाजिक संस्थेचे काम करीत असतांना अनेक अडचणीही आल्या पण त्यांच्याकडील माणसांची श्रीमंती अधिक होती असे ते म्हणतात. माणसांना ऐकून घेण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांना माणसे समजली आणि ते सर्व स्तरावरील माणसांना सोबत घेवुन समाजसेवा करीत आहेत हि बाब अधोरेखीत करणे गरजेची वाटते.
तळागळातील जनतेच्या प्रश्नासाठी पहिल्या पिढीचे कायद्याचे अभ्यासक होणे फार कष्टदायी असते हा प्रवास कमालीचा आव्हानांचा आणि कठीणात कठीण परीक्षा पाहणारा असतो तो यांच्याही वाटेला आला पण ‘आयुष्यात जे जे पुढ्यात वाढून ठेवलं ते ते मोठ्या उमदीने वेचनार हे नाव’ केवळ एका क्षेत्रापुरत मर्यादित नाही म्हणुन वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध गटांतील वेगवेगळ्या प्रवाहातील वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांचा गोतवाळा त्यांनी जमा केला. 'कायदा' हा विषय उच्चारताच कायद्याचे जनक संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण होते विशेषतः त्यांनीच दिलेल्या शिकवणीतून प्रज्ञा, शील, करुणा , समता, स्वतंत्र न्याय बंधुता, लोकशाही मार्गाने चालणारे व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना उत्कृष्ट पत्रकारिता व कायद्याचे जाणकार अभ्यासक नव्या युगातील साहेब म्हणून ॲड. नवनाथजी भद्रे आज लोकमानसात प्रचलीत आहेत.
जनतेच्या प्रश्नांची अचुक जाण दूरदृष्टी असणारे सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे कणखर नेतृत्व ज्यांचे बहुसंख्य लोकांवरती माणुसकीच्याप्रती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऋण आहेत. असे लोकांतून एकवेयास मिळते. ज्यांच्याकडे विद्वत्ता असते त्यांच्या निष्ठा सतत जागृत असतात आणि ते सतत समाजाप्रती प्रयत्नशील असतात अशी माणसं महान होतात ॲड. नवनाथजी भद्रे यांच्या जीवनातून शून्यातून विश्व कस उभ करावं, शून्याच मूल्य संस्कृतीच्या प्रवाहात समाजसेवेच्या माध्यमातून कस विकसीत करावं समाज आणि संस्कृती कशी जपावी. मानवतेचा धर्म जात – धर्मापलिकडे जावून कसा निभावावा समाजसेवेचा आणि कायद्याचा काय संबंध कसा असावा या सर्व प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे सापडतात. अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभाव असला तरी कामाप्रती असलेली निष्ठा कल्पकता यासोबतच समाजसेवेचे व्रत अंगी बाळगले असल्याचे वेळोवेळी दिसून येते.
अभ्यास – सायास – प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जिवन घडवीत असतात. म्हणून राजकीय व्यक्तिमत्व असूनही अत्यंत खूप कमी वेळा राजकारण केले निवडणुका सरल्या की त्यांच्यात मूलभूत असलेले समाजकारण आपोआप सुरू होते त्यामुळे सर्वच पक्षांत त्यांनी आपले मित्र जपले राजकरणापलीकडे व्यकीगत मैत्री व ऋणानुबंध कायम टिकवित असतात या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशातून ‘समता मानव विकास फाऊंडेशनची’ स्थापना केली या फाऊंडेशनचे कार्य वैविध्य ठरत आहे. सामान्यांना आपलेसं करणे ही मोठी कठीण गोष्ट असते पण यांना हे सहज जमत कारण ते जनसामान्यांच्या समस्यांना मनापासून भिडतात लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांचे उत्तरे शोधण्याच्या कामात ते गढून जातात ते हरएक कृतिकर्यातून बघायला मिळते. मनाचा मोठेपणा असलेले दातृत्व आणि कर्तुत्वाचा झरा अखंडपणे समाजाच्या वंचितांच्या शोषितांच्या भल्यासाठी वाहणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा….
संकलन
मंगलदीप सिताफुले
शब्दांकन
तुकाराम वाघमोडे
संदेश सोनकांबळे