

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ने राखली HSC बोर्ड परीक्षेत 100% निकालाची परंपरा.
देवणी :- देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्याने HSC बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे . शाळेचा 100% निकाल लागला आहे . विद्यालयातून सलाउद्दीन मचकुरी याने 78% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर भंडे प्रज्वल या विद्यार्थ्याने 75.67% मिळवून द्वितीय क्रमांक तर आदित्य भोसले याने 73.33% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे . जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनी चे अध्यक्ष मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब , संस्था सचिव गजानन भोपणीकर ,शाळेचे प्राचार्य ,उपप्राचार्य आणि शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.