देवणी / प्रतिनिधी :
जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी या संस्थेचे संस्थापक सचिव व ज्यांच्या संकल्पनेतून रसिका शैक्षणीक संकुलाची स्थापना झाली असे शिक्षणप्रेमी कै. आबासाहेब भोपणीकर यांची आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज देवणी येथे 14 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व पुष्प अर्पण करून कै.आबासाहेब भोपणीकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, रामराव भोपणीकर , प्रा. डॉ. चंद्रकांत जावळे, आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्रा. राहुल बालुरे, चेअरमन अंकुश बागवाले, गजानन लांडगे, अंकुश माने, विजयनगरचे माजी सरपंच सुरेश पाटील, सुरेश चिंचोळे, नरसिंग नागराळे, प्रताप कोयले ,प्रशांत घोलपे, प्रविण बेळे, शरद भोसले, जाफरभाई मोमीन, प्रीतम अष्टुरे, संताजी पाटील, कृष्णा इंगोले, पत्रकार राहुल बालूरे,आनंदराव बिरादार, शुभम पाटील, नगरसेवक अनिल इंगोले,
ॲड. बिरादार, बालाजी टाळीकुटे, जाकिर बागवान यांच्यासह देवणी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, आबासाहेब इंग्लिश स्कूल मधील उप प्राचार्य रामदास नागराळे, लीड को ऑर्डीनेटर क्षेमानंद कन्नाडे व रणजीत गायकवाड, वस्तीगृह अधीक्षक मंजूनाथ कन्नाडे, विजयकुमार भोजने आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तसेच कै.रसिका महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. शिवाजी सोनटक्के तर आभार रामदास नागराळे यांनी मानले.यावेळी दोन मिनिटाचे मौन बाळगून कै.आबासाहेब भोपनीकर यांना अभिवादन पर आदरांजली अर्पण करण्यात आली.
