आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देवणी येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न..                   आबासाहेब इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज देवणी येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष गोविंदराव भोपनीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जावळे, लीडचे कार्यकारी अधिकारी पयीम, निखिल जैन,साबणे लक्ष्मी, माया नरवटे, विजय पाटील, दिलीप लोकरे, इत्यादी उपस्थित होते. यात दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक साजरे केले व पालकांनी प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आबासाहेब इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राहुल बालूरे यांनी करत असताना शैक्षणिक वर्षातील यशस्वी वाटचाली बद्दलची माहिती व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेने मिळवलेल्या यशाबद्दलची माहिती पालकांसमोर मांडली व व्यवस्थापन समन्वयक सुप्रिया कांबळे यांनी भविष्यातील शैक्षणिक योजनेबाबतची माहिती दिली.ओलंपियाड स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हर्ष कोरे, साईनाथ कोयले,दिव्या सुर्वे तर विभाग स्तरातून दत्तात्रेय काकनाळे व शाळा स्तरावर परीक्षा टिळे, प्रेम मेलकुंदे,नागनाथ सूर्यवंशी,ओमकार सूर्यवंशी,अक्षरा कोनाळे इत्यादी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले व पालकांना शिक्षणाबाबतचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यज्योती हुड्डा व साक्षी मुळे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद नियाज यांनी केले. हा कार्यक्रम जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य राहुल बालूरे, लीड समन्वयक क्षमानंद कानडे,सुप्रिया कांबळे इत्यादी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाला पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ByAgro India

Apr 3, 2024

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देवणी येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
आबासाहेब इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज देवणी येथे पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष गोविंदराव भोपनीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जावळे, लीडचे कार्यकारी अधिकारी पयीम, निखिल जैन,साबणे लक्ष्मी, माया नरवटे, विजय पाटील, दिलीप लोकरे, इत्यादी उपस्थित होते. यात दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक साजरे केले व पालकांनी प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आबासाहेब इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राहुल बालूरे यांनी करत असताना शैक्षणिक वर्षातील यशस्वी वाटचाली बद्दलची माहिती व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेने मिळवलेल्या यशाबद्दलची माहिती पालकांसमोर मांडली व व्यवस्थापन समन्वयक सुप्रिया कांबळे यांनी भविष्यातील शैक्षणिक योजनेबाबतची माहिती दिली.
ओलंपियाड स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर हर्ष कोरे, साईनाथ कोयले,दिव्या सुर्वे तर विभाग स्तरातून दत्तात्रेय काकनाळे व शाळा स्तरावर परीक्षा टिळे, प्रेम मेलकुंदे,नागनाथ सूर्यवंशी,ओमकार सूर्यवंशी,अक्षरा कोनाळे इत्यादी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले व पालकांना शिक्षणाबाबतचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यज्योती हुड्डा व साक्षी मुळे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद नियाज यांनी केले. हा कार्यक्रम जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य राहुल बालूरे, लीड समन्वयक क्षमानंद कानडे,सुप्रिया कांबळे इत्यादी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाला पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp