आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,देवणी येथे रासिकोत्सव-2022 साजरा
देवणी : येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर व लातूर जिल्हा कृषी अधीक्षक मा. श्री. दत्तात्रयजी गावसाने , प्राथमिक शिक्षण समितीचे सदस्य शिवाजीराव साखरे यांच्या हस्ते रसिकोत्सव 2022 या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यातआले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया अ. कांबळे यांनी मांडले. यावेळी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनेचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर, शिवाजीराव साखरे, दत्तात्रय गावसाने रंगा राचुरे यांनी विद्यार्थ्यांची स्तुती करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे संस्था सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर, राजेंद्र कदम, रामराव बिरादार, राजाराम भोसले इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन रसिकोत्सव 2022 द ॲन्युअल डे या नावाने साजरा करण्यात आले. विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असता त्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. तसेच क्रीडाशिक्षक विक्रम गायकवाड यांचा सत्कार करून गौरव करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बालगीते ,लोकगीते, भारुड, लावणी, इत्यादीवर नृत्य सादर करून पालकांची व रसिकांची मने जिंकली. जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी या संस्थेच्या वतीने आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया कांबळे आणि उप मुख्याध्यापक डॉ. सत्यवान सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला.
अप्रतिम अशा वार्षिक स्नेहसंमेलनाचे म्हणजेच रसिकोत्सव 2022 द ॲन्युअल डे या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनेचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपनिकर व संस्थेचे सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे प्रमुख विजयकुमार भोजने, प्रशांत घोल्पे व रणजीत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे जबाबदारीने नियोजन केले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश आंबेनगरे विक्रम गायकवाड, रामदास नागराळे, उद्धव म्हेत्रे,भीमराव महाके, विश्वनाथ बिरादार, वैष्णवी बिरादार, रेणुका पतंगे, स्वाती कोयले, श्रद्धा डोंगरे, प्रतीक्षा सूर्यवंशी, सबा सय्यद, नेहा शेख ,सुवर्णा सोनटक्के, पूजा ढगे ,मोहसीन शेख, रेखा आडे, योगेश्री काकनाळे, संदीप जळकोटे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा लोकरे व आभार प्रियांका मंटोळे यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी पालकांची व इतर रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली व तसेच भरभरून प्रतिसाद दिला.