आबासाहेब इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे 76 वे स्वातंत्रता दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे संस्था अध्यक्ष माननीय गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी सैनिक दाऊद उंटवाले, माजी सरपंच देविदास पतंगे, व्यापारी मल्लेवाले रसीद,प्रसिद्ध पत्रकार प्रताप कोयले इत्यादी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. तसेच रसिका कॉलेजचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत जावळे उपप्राचार्य डॉ .शिवाजी सोनटक्के तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य रामदास नागराळे यांनी केले .तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाषणांनी मान्यवराची लक्ष वेधून घेतले. तसेच वेगवेगळ्या खेळाचे स्पर्धा झालेली पारितोषक अध्यक्ष व मान्यवरांचे हस्ते देण्यात आले .माजी सैनिक दाऊद उंटवाले यांनी आपल्या भाषणातून वेगवेगळ्या समाजसुधारकांची ओळख करून दिले व देशासाठी दिलेल्या बलिदान याबद्दल विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. माननीय गोविंदराव भोपणीकर साहेबांनी अध्यक्षीय समारोह करत मुलांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्थेचे सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कोयले यांनी केले यावेळी शाळेतील लीड समन्वयक क्षेमानंद कन्नाडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
