खंत एका समाजाची..जागृत मतदाराची….!!

खरं तर आज महाराष्ट्र राज्य प्रगती पथावरील पुरोगामी राज्य म्हणून देशात संबोधले जाते. याच राज्यात आनेक धर्माची जातीची लोकं येथे राहतात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लावतात..आसाच एक महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत एक हातभार लावत आसलेला समाज म्हणजे आनूसुचित जाती समुहापैकी आसलेला “होलार” समाज राज्यात मुंबई पासून नांदेड पर्यंत सोलापूर पासून नागपूर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात विखूरलेला आसून देश स्वातंत्र्य झाल्यापासून आज पर्यंत विकासापासून कोसो दूर राहिलेला किंबहुना त्यापासून वंचित ठेवलेला समाज म्हणजे होलार समाज..
लोकशाहीचा विचार केला तर लोकांच्या संख्यावर महत्त्व दिले जाते तसे पाहिले तर या समाजातील लोकं अत्यंत गरिब,अशिक्षित, भित्री,अज्ञानी, अंधश्रद्धाळू,प्रामाणिक, कष्टाची कामे करण्यात पुढे, कनवाळू, आपमतलबी नसल्याने त्यांना त्यांचे आस्तित्वंच कळले नाही.. आणि रोजगार म्हणून मिळेल ते कामे उदरनिर्वाहासाठी करत गेल्याने जनगणनेच्या वेळी कामाच्या आधारावर सदर लोकांच्या जातीच्या नोंदी “मांग,महार,चांभार, ढोर,धनगर,आदी जातीमध्ये नोंदी झालेल्या आहेत किंवा तेथील राजकीय पुढाऱ्यांनी तशी नोंदी करून घेतले आसू शकतात..याचाच फटका या जातीच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी निर्माण झाल्याने आमचा नेता नाही, नेतृत्व तयार होऊ शकले नाही, धन,दौलत प्रौपर्टीज तयार झाले नाहीत… किंबहुना होऊ दिले गेले नाहीत.. या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी समाज शिकला पाहिजे होता परंतु आठरा विश्व दारिद्र्य पाठीशी घेऊन पिढ्यानपिढ्या कुडत जगणारा जगाच्या पाठीवर एकमेव आसलेला समाज म्हणून एक ओळख आहे. जग विज्ञानाच्या सहाय्याने चंद्रावर, मंगळावर जात आहे. परंतु भारतातील महाराष्ट्र राज्यासारख्या विकसित राज्यात होलार समाजाची आजही हाल अपेष्टा होत आसल्याचे चित्र पहायला मिळते.
1947 ला भारत स्वतंत्र झाला जरी आसला तरी त्या स्वातंत्र्याचे फळं आजूनही होलार समाजाला चाखता येत नसेल तर ते स्वातंत्र्य काय कामाचे याची खंत वाटते..!! गेल्या 75 वर्षापासून या देशात लोकसभा,राज्यसभा विधानसभा,विधानपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत च्या निवडणुका होत आसतात या प्रत्येक निवडणुकीत होलार समाजातील लोकांचे मतदान घेतले जाते लोकप्रतिनिधी म्हणून खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, मंत्री, अध्यक्ष,सभापती, सरपंच आदी संविधानिक पदे मिळवतात परंतु त्याच संविधानाने मतदारांचा विकास किंवा त्याच्या आडीआडचणी जाणून घेण्याचा कधी आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून आमच्या वस्तीकडे,घराकडे कधी फिरकलेच नाहीत म्हणून आमची जी वाईट आवस्था आहे त्याला आम्ही दिलेल्या मतदानातून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. कारण या देशात ,राज्यात आनेक राष्ट्रीय पक्ष,राज्य पक्ष,संघटना आहेत, उदा.राष्ट्रीय काँग्रेसपक्ष,भारतीय जणता पार्टी, बहुजन समाज पार्टी, डावे,उजवे,रिपब्लिकन पार्टीज् राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,आदी पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटना या सर्व पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा जाहरनामा प्रसिद्ध करतात परंतु त्या प्रमाणे विचार करीत नाहीत आणि कामे ही करीत नाहीत.. मग लोकशाहीचे विकेंद्रीकरण कसे होणार जो तो येतो धर्म, जात पुढे करून मतदान घेतो आणि पुढे जशाचतसे..!
बरं भावी लोकप्रतिनिधींनो आमचे मतदान स्वातंत्र्य मिळाल्यापासून घेत आहात..लोक प्रतिनिधी म्हणून आमच्या होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक तरी काम केलात का.? आमच्या लोकांच्या पिढ्यानपिढ्या खपल्या आजही कायम आहे. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी काय गैरंटी देता..शिक्षण,नौकरी,रोजगार, घरे,सामाजिक उन्नती, राजकीय आवहेलना,वैज्ञानिक दृष्टीकोन, स्वंरोजगार,व्यापार,उद्योग व्यवसाय साठी आपल्याकडे कांहीं आहे का ठोस उपाययोजना.. हं..मी कोणाकडून अपेक्षा करतोय..!!
खरंतर आपल्या शेतात काम करून मळे फुलवतो आम्ही.. आपल्या घरी काम करून बंगले सजवतो आम्ही.. ऊसतोडणी साठी थंडी, ऊन,पाऊस वारा सोसून साखर कारखाने चालवून देशात साखरेचे उत्पादन वाढवतो आम्ही… शाळा.. कौलेज इमारती बांधतो आम्ही.. त्या शाळेत आणि कौलेज मध्ये मात्र विद्यार्थी शिकतात तुमचे..रस्ते..पुलं..धरने बांधतो आम्ही परंतु त्याच रस्त्यावर आम्हाला चिरडले तुमच्या गाडीने..ज्या धरणाच्या खाल्या खस्ता तेथील पाणी सुद्धा पिण्यासाठी भेटत नाही.. तुमचे कारखाने..आम्ही मात्र कायम कामगार आमच्या जिवनाची होतेय गार तुमच्याच इमारती वाढतात फार..!!
दरवेळेस निवडणुका लागतात आश्वासने दिली जातात ती आश्वासने काही पाळली जात नाहीत मात्र या ठिकाणी गरिब वंचित घटकांची धर्माच्या नावाखाली घरे जाळली जातात.तरीही येथे कोणी जाणता राजा म्हणून तर कोणी हिंदू -हदयसम्राट,आच्छेदिनाचा आवतार कोणी मी पुन्हा येईनचा नारा देणारे सगळेच्या सगळे फसवेगिर दिसतात..आम्ही मात्र वंचित आसल्याचे कोणाच्याही डोळ्याला दिसत नाही.. हा आमचा गुन्हा आहे का.? कधीकधी आसे वाटते आमच्या पेक्षा बांगलादेशातील लोकांची काळजी घेणारे महाभागही आहेत परंतु या देशातील तुमच्या सोबत शेजारी राहणारे वर्षानुवर्षे दारिद्रयात खितपत पडलोय..सामाजिक अन्यायग्रस्त झालोय..राजकीय आनास्थेचे बळी ठरलोय..प्रशासकीय यंत्रणेचेही बळी ठरलोय..स्वप्नं उनाड झालीत..आशा साऱ्या मावळल्यागत झाल्यात प्रतिष्ठेने जगण्याचे सर्व मार्ग आमच्यासाठी बंद आहेत म्हणून वाटतेय..लोकशाहीचा खून तर येथे झाला नाही ना.? संविधानाचे प्रत्येक पान सांगतेय.. देशातील शेवटच्या वंचित घटकांना स्वातंत्र्य, समता,न्याय आधारित लोकशाही देण्यासाठी कट्टिबद्ध आहे मी परंतु लोकशाहीच्या आडून निवडून येणारे धनदांडगे ठोकशाहीचे धंदेवाले मात्र वंचितांच्या ठायी मला मात्र येऊ देत नाहीत.. दररोज पार्लमेंट,सर्वोच्च न्यायालय, विधानसभा,माध्यमांची दारं मात्र आजघडीला वंचित घटकांना विकासाच्या टप्यावर घेत नाहीत.!!
आजवर आम्ही तुम्हाला खासदार केले,आमदार केले,नामदार केले परंतु आमची आवहेलना आजही होताना दिसते लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जसे विकासाला जबाबदार आहात तसेच आमच्या आधोगतीलाही तुम्हीच जबाबदार आहात..!!आमचे जिवनच वेदनादायी आहे.. म्हणून म्हणावे वाटते आम्ही आपल्याला मतदान का करायचे..??