देवणीत चार प्रभागासाठी ७९ .५२ % मतदान तर एकूण सतरा प्रभागांची मतमोजणी होणार बुधवारी

देवणी , ता.१८ (बातमीदार) : येथील राहिलेल्या उर्वरित चार प्रभागाचे मंगळवारी (ता.१८) मतदान झाले आसून यामध्ये १७५६  मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.यांची टक्केवारी  ७९.५२% इतकी आहे.
    नगरपंचायतच्या चार प्रभागासाठी चार बुथवर मतदान झाले.प्रभाग ५ , ८ , १० , ११ ,या चार प्रभागातुन २२०८ मतदारापैकी १७५६  मतदारानी हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ७९.५२%  इतकी आहे.
सकाळी ११.३० वाजेपर्यत केवळ ३९.३१% तर ३.३० वाजता मतदानाचा टक्का ७०.३८ वर पोहचला.  पण दुपारनंतर प्रत्येक बुथवर रांगा लागल्या होत्या.
निवडणुक अधिकारी शोभा जाधव व सहाय्यक तहसिलदार सुरेश घोळवे  व मुख्याधिकारी एस.ए.बोंधर यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडली.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.पोनि गणेश सोंडारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ दिनेशकुमार कोल्हे यांनीही दरम्यान भेट दिली.

बुधवारी ११ पर्यत निकाल..

यापुर्वी झालेल्या १३ प्रभागाचे व मंगळवारी झालेल्या चार प्रभागाचे अशा एकुण १७ प्रभागाची मतमोजणी बुधवारी (ता.१९) सकाळी १० वाजता तहसिलकार्यालयात होणार आहे.एकुण ४ टेबलवर ५ फेऱ्यात ही मतमोजणी होणार असुन पहिल्या टेबलवर  प्रभाग १, ५ , ९ , १३ , १७  तर टेबल दोनवर प्रभाग २  ,६ , १० , १४,टेबल तीनवर  ३ , ७ , ११ , १५ , तर टेबल चारवर प्रभाग ४ , ८ ,१२ ,१६ ची मतमोजणी होणार आहे.उमेदवार व उमेदवार प्रतिनिधीनी मतमोजणीसाठी उपस्थित रहावे असे तहसिलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले ११.१५ वाजेपर्यंत संपुर्ण निकाल लागणार असुन निकालाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp