आश्रमशाळा संस्थाचालकांचे प्रश्न शासन दरबारी मांडू-मा.आ. गोपीचंद पडळकर
नवोदित आश्रम शाळा संस्था प्रमुखांचा संस्थेच्या वतीने सन्मान….
चाकूर/ जानवळ .
चाकूर तालुक्यातील जानवळ येथील अहिल्याबाई होळकर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित कै.जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेस नुकतीच विधान परिषदेचे मा.आ.गोपीचंद पडळकर साहेबांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यूज नामाचे संपादक मा. इस्माईल शेख सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचालिका डॉ.अश्विनीताई टोम्पे, संस्थाचालक डॉ. शशिकिरणजी भिकाने, मा.सुधीरदादा गोरटे ,मा.भागवतजी केंद्रे, संपर्कप्रमुख मा.इंद्रजीतजी बैकरे, विवेकानंद लवटे , दै. पुण्यनगरी चे साखराप्पा वाघमारे , धोंडीरामजी म्हेत्रे उपस्थित होते.
या शुभप्रसंगी आश्रमशाळा परिवारातर्फे पडळकर साहेबांच्या हस्ते लातूर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आश्रमशाळा संस्थाचालकांचा सन्मान करण्यात आला.
पडळकर साहेबांनी मनोगतात बोलताना भावी आयुष्यात विद्यार्थ्यांनी वंचितांना न्याय देण्यासाठी राजकारणातील अथवा प्रशासनातील सर्वोच्च पदावर पोहोचण्याचे आवाहन केले. आश्रमशाळेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्रातील आश्रम शाळा संस्था चालकांचे प्रश्न निश्चित पणे शासन दरबारी मांडू असे जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य निलेश राजेमाने सर यांनी,सूत्रसंचालन प्रा. योगेश कदम व आभार देवानंद केंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिष शेळके, रामदास सोनाळे, किशोर पवार, धनराज कांबळे व सर्व शिक्षक, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी जाणवळ येथील ग्रामस्थ, पालक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.