

आषाढी एकादशी निमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवणी चा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
देवणी :- देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.या दिंडीचे प्रस्थान बोरोळ चौक येथून झाले .बोरोळ चौक येथे माऊलीच्या पालखीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी महिला व बालकल्यान सभापती जि.प. लातूर कुशावर्ताताई बेळे,जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे सचिव गजानन भोपणीकर ,नगरसेविका सत्यभामा घोलपे, बाबूराव लांडगे ,नगरसेवक जाफर मोमीन , नगरसेवक अमित सुर्यवंशी, नगरसेवक योगेश ढगे , पोलीस उपनिरिक्षक माणिकराव डोके, पत्रकार प्रताप कोयले , प्रवीण बेळे , अमरदिप बोरे आदी मान्यवर उपस्थित होते .त्याच बरोबर आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या सुप्रिया कांबळे , उपप्राचार्य रामदास नागराळे लिड समन्वयक क्षमानंद कनाडे , प्रशांत घोलपे , विजयकुमार भोजने सांस्कृतीक विभाग प्रमुख जयश्री माने यांच्या सह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या नादात ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात तल्लीन होऊन पावलांचा ठेका धरत नृत्य , लेझिम सादर केली
विठ्ठलाच्या वेशभूषेत समर्थ सूर्यवंशी आणि रुक्मिणीच्या वेशभूषेत नंदिनी सूर्यवंशी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील या विद्यार्थ्यानी देवणी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आणि या दिंडी यात्रेची विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आरती करून सांगता करण्यात आली.