तालुक्यातील ग्रामपंचायत चा निकाल जाहीर..
देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक नूकतीच संपली आसली तरी तिचा शेवटचा टप्पा आसलेला निकाल आज तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय आधिकारी यांनी खालील प्रमाणे जाहीर केले आहे.
तालुक्यातील चवणहिप्परगा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी शकुंतला मोहन मोरे तर नागतिर्थवाडीच्या सरपंचपदी कोमल धोंडराज गुणाले या विजयी झाल्या आहेत.अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत विरोधी पॅनलच्या धुव्वा उडवत दोन्ही गावांतील पॅनलने एक हाती सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहेत.
सोमवारी सकाळी अकरा वाजता येथील तहसील कार्यालयात दोन टेबलावर मतमोजणी पूर्ण करण्यात आली.निकालाचे कल हाती येताच तहसील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला.चवणहिप्परगाचे सरपंच पद सर्व साधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने शकुंतला मोरे,शेख जरीनाबी, दिपाली बिरादार,व कमलबाई गुंडरे यांच्यात लढती रंगल्या होत्या मात्र प्रा.व्यंकट पाटील यांच्या जालनाथ महाराज ग्रामविकास पॅनलच्या शकुंतला मोरे यांनी १२४ मतांनी बाजी मारत विरोधी उमेदवारांचा पराभव केला.अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या लढतीत ९ पैकी विरोधी गटाचा केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे.विजयी उमेदवारांत लोकनियुक्त सरपंच मोरे शकुंतला तर सदस्यांत तातेराव कांबळे,पुजा पिलगुरे,सत्यशिला कांबळे, तुळशीराम तेलंगे,चांदपाशा शेख, सविता कांबळे, इस्माईल शेख,विमल पठाळे,राजेश्री बिरादार यांचा समावेश आहे.ग्रामस्थांच्या वतीने विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
नागतिर्थवाडीचे सरपंचपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेकरिता राखीव असल्याने येथे दुरंगी लढती रंगल्या होत्या.त्यामध्ये विद्यमान सरपंच धोंडराज गुणाले यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलच्या कोमल गुणाले यांनी २८मतांचे मताधिक्य मिळवत विरोधी गटाच्या उमेदवारांचा पराभव केला. शिवाय सरपंचपदासह ५ जागेवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळवले.तर विरोधी गटास केवळ दोन जागेवर यश मिळाले.विजयी उमेदवारात सरपंचपदी गुणाले कोमल तर सदस्यपदी गुणाले नागनाथ,कासले प्रतिभा, पाटील जिजाबाई,पेटे भरत,येलमटे जयश्री,रामासने ज्ञानोबा,कासले स्वाती यांचा समावेश आहे.विजयानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना आलिंगन देत व घोषणाबाजी करित विजयी जल्लोष साजरा केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार गजानन शिंदे, गणेश गोपनवाड ,राहुल पत्रीके ,नाजीम मोमीन यांनी काम पाहिले.यावेळी विष्णुकांत गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









