उदगीर , (प्रतिनिधी )
येथील लक्ष्मीबाई प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्याना इनरव्हील कल्बच्या वतिने बुधवारी (ता.१९) शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्षा स्वाती गुरुडे, मीरा चांबुले
सचिव मानसी चेन्नावर खजिनदार
पल्लवी मुक्कावार ,योजना चौधरी सचिव प्रिया नारखेडे , शिल्पा बंडे
गंगा पांडे , सुवर्णा हेंगणे , सुजाता कोनाळे , स्वाती बिरादार ,कल्पना नागरगोजे ,आशा घोणसीकर ,जयश्री गुरुमे ,अर्चना मुसणे ,विश्वगुरुकुल प्रि.प्रायमरी इग्लिश स्कुलच्या प्राचार्या दैवशाला कप्पे यांची उपस्थिती होती. शाळेत गोपाळनगर ,समतानगर या परिसरातील मोलमजुरी करण्याऱ्या गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती नाजुक आसल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्यास पालक हतबल ठरतात.त्यामुळे शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून इनरव्हिल क्लबने शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शहरातील महिला एकत्रित येऊन खर्चासाठी मिळालेल्या पैशातून इनरव्हीलच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. या उपक्रमास लक्ष्मीबाई प्राथमीक शाळेचे एस.बी.शिवशेट्टे एस.एम. पाटील ,सौ.व्हि.व्हि.करेप्पा , ,टि.आर.मुसने ,बालाजी कवठाळे ,जे.एच.बंडेवार ,पी.के.शिंदे ,एस.डी.सुरनर यांनी सहकार्य केले.
