उत्कृष्ट फोटोग्राफर ते यशस्वी उद्योजक चंद्रकांत (उर्फ चंदू )बंडगर
देवणी : फोटोग्राफी तंत्रज्ञानाच्या युवगात जे काही नवं ते देवणी साठी पहिलं हवं म्हणून फोटो ग्राफिच्या संदर्भात ज्या सुविधा पुणे मुंबईला दिल्या जातात त्या सुविधा अवगत करून चंद्रकांत उर्फ चंदू बंडगर हा उमदा युवक महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेल्या देवणी तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्याला देतोय ही एकआमच्या देवणी तालुक्याची शान व मान सन्मान वाढविणारी बाब आहे अशा यशस्वी उद्योजक चंदू बंडगर यांचा आज दि 6 जुलै रोजी वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसा बद्दल शुभेच्छा देण आमचं कर्तव्य समजतो त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची स्थाप मारणं व त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे आमचे कर्तव्य समजतो सर्वप्रथम माझ्या लोकवैभव परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो
चंदू बंडगर हा साधी राहणी उच्च विचार ठेवून सामाजिक बांधिलकी जोपसणारा एक यशस्वी उद्योजक तो ज्या क्षेत्रात पाय ठेवेल तिथे यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही चिकाटी मेहनत जिद्द त्या क्षेत्रातील अभ्यास यांच्या जोरावर अगदी कमी वेळात कमी वयात नावारूपाला आला आहे उद्योग धंद्यात ग्राहकांशी तोंडात साखर व डोक्यावर बर्फचा खडा ठेऊन ग्राहकांना सेवा वागणूक कशी द्यावी हे मात्र चंदू बंडगर त्यांच्याकडून शिकून घ्यावं हे चंदूच्या यशस्वी उद्योजक होण्याचं गमक आहे असच म्हणावं लागेल ग्रामीण भागात चंदू बंडगर यांनी फोटोग्राफर क्षेत्रात घेतलेली उतुंग भरारी ही नेत्रादीपक आहे
फोटोग्राफी या शब्दाचा शाब्दिक अर्थ ‘प्रकाशा सह रेखाचित्र ‘ जो ग्रीक फोटोपासून आला आहे म्हणजे प्रकाश आणि आलेख काढणे छायाचित्रण ही प्रतिमा प्रकाशसंवेदनशील चित्रपटावर किंवा डिजिटल फोटोग्राफीच्या बाबतीत डिजिटल इलेट्रॅनिक किंवा चुंबकीय मेमरीद्वारे रेकार्ड करण्याची प्रक्रिया म्हणजे फोटोग्राफी होय
चंदू बंडगर यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा म्हणून आपल्याकडे जे फोटोग्राफी संदर्भात अवगत ज्ञान आहे ते इतरांना द्यावे म्हणून चंदू बंडगर यांनी अक्षरशः फोटो ग्राफिचे क्लाससेस चालू केले आहेत म्हण्टल तरी चुकीचं होणार नाहीत चंदू बंडगर यांनी अनेक मुलांना उत्तम फोटो ग्राफिचे धडे देऊन एक उत्तम फोटोग्राफर घडविण्याचे कार्य चंदू यांनी केले आहे युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम चंदू बंडगर करीत आहेत
चंदू बंडगर यांचे सोशल माईंड असल्याने सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राकडे ओढ आहे “एक मेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेतून कार्य करीत असतात त्यांच्या हातून असेच कार्य घडत राहो व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच वाढदिवसाच्या निमित्याने लाख लाख शुभेच्छा
गिरीधर गायकवाड 7028961400