उदगीर / प्रतिनिधी : दिनांक-१५/१/२०२४ म.अनिस शाखा उदगीर च्या वतीने भूगोल दिवस व प्राचार्य ना,य, डोळे जयंती साजरी.. जमहूर हायस्कूल उदगीर येथे 15 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर च्या वतीने प्रसिद्ध समाजवादी विचारवंत प्राचार्य ना.य. डोळे सर यांची जयंती व भूगोल दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जमहूर हायस्कूलचे सुपरवायझर वाजिद गोलंदाज, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरुजी तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील भूगोल विषयाचे प्रा.डॉ. मुकेश कुलकर्णी, अनिस उदगीर चे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डोळे सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनिसचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका विषद केली. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी भूगोल विषयाचे महत्त्व सांगताना ग्रह व नक्षत्र यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. हज़ारो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही.सूर्यग्रहण चंद्रग्रहण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. समाजात पसरलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ना.य. डोळे सर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकताना मुडपे गुरुजी यांनी डोळे सरांनी उदयगिरी महाविद्यालयात शिक्षणासाठी केलेल्या विविध प्रयोगावर प्रकाश टाकला. उच्च शिक्षणामुळे उदगीर चे नाव डोळे सरांचे उदगीर असे पडले. उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे नमूद करताना मूडपे गुरुजींनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिस शाखा उदगीर चे प्रधान सचिव प्रा. डॉ. बळीराम भुकतरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष बाबुराव माशाळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ अस्गर शेख, सिद्दिकी अलीमुद्दीन, कांता बुळ्ळा, हणमंतराव बुळ्ळा, डॉ. कोंडीबा भदाडे,जमहूर विद्यालयातील सर्व स्टाफ,ज्युनिअर काॅलेज,डी.एड. महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ, जिव्हाळा ग्रुप, तसेच डोळे सरांवर प्रेम करणारे शहरातील अनेक रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करून करण्यात आला. यावेळी सर्वधर्मसमभाव, गंगा जमुना संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp