मराठी पञकार परिषदेचे राज्यभर आयोजन


उदगीर (प्रतिनिधी) : मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पञकार परिषद मुंबई व इंडियन मेडीकल असोसिएशन उदगीर च्या वतिने मंगळवारी (ता.३) सकाळी ९ ते १२ वाजे पर्यत मातृभुमी महाविद्यालय ,देगलुर रोड उदगीर येथे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकारांचं आयुष्य दगदगीचं असतं. जागरण, अवेळी जेवण, तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो.मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते.. विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते.. अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी अखिल भारतीय मराठी परिषदेचा वर्धापन दिन राज्यभरात ३ डिसेंबर रोजी”पत्रकार आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो. या शिबीरात प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे. शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यासाठी बालरोगतज्ञ डाॅ. बाळासाहेब पाटील , डाॅ. महेश जाधव ,जनरल फिजीशियन डाॅ. संगमेश्वर दाचावार , सर्जन माधव चंबुले , हृदय रोग तज्ञ डाॅ. प्रशांत चोले जनरल फिजीशन डाॅ.अनुप चिकमुर्गे , स्ञिरोगतज्ञ डॉ. स्वाती पाटील , डाॅ. सोनल मोरे , सर्जन डाॅ. संजय चिल्लरगे , अस्थिरोगतज्ञ डाॅ.अजय महिंद्रकर , नेञतज्ञ डाॅ. ज्योती सोमवंशी , मधुमेहतज्ञ डाॅ. प्रशांत नवटक्के इत्यादी तज्ञ डाॅक्टरची टिम तपासणी करणार आहे.
तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पञकार परिषदेचे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे , इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील ,सचिव डाॅ. महेश जाधव , उदगीर जिल्हा मराठी पञकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी ,सचिव सुनिल हवा , मराठी पञकार संघाचे अध्यक्ष प्रा. बिभीषन मद्देवाड , सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी ,प्रेस मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष प्रभुदास गायकवाड ,सचिव बसवेश्वर डावळे यांच्या सह सर्व पञकाराच्या वतिने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp