उदगीरात आरक्षण परिषद संपन्न
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
उदगीर येथील सकल मातंग समाजाच्या वतीने सैनिकी विद्यालय,उदगीर येथे अनुसूचित जाती आरक्षण(आ,ब,क,ड) वर्गीकरण परिषद आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ टी.एन.कांबळे हे होते. या परिषदेच्या विचारपीठावर आमदार जितेश अंतापूरकर, प्राचार्य राजकुमार मस्के, विचारवंत केशव शेकापूरकर, उद्योजक दिलिपजी गायकवाड, माजी पोलीस अधिकारी शिवाजीराव सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे युवानेते चंदन पाटील नागराळकर,नवनाथजी गायकवाड, अशोकजी शेल्हाळकर,मास संघटनेचे नेते नितिन तलवारे,विधीज्ञ विष्णू लांडगे, प्रा.रामभाऊ कांबळे,राजू कसबे,औसाचे माजी नगराध्यक्ष लहू कांबळे लांडगे डि,व्ही,अभंग सुर्यवंशी, वसंत बिबिनवरे,उध्दव शिंदे,पत्रकार राजू किनीकर,लक्ष्मण रणदिवे,उषा भालेराव,बाबु रणदिवे,विशाल सुर्यवंशी,मारोती सुर्यवंशी,शेषेराव सुर्यवंशी,बाळु मोघा, गोविंद जाधव सह अनेक मान्यवर उपस्थित होते.मातंग समाज देशासाठी त्याग आणि बलिदान,सेवा केली परंतु या समाजाला देशाने पाहिजे त्या प्रमाणात राजकीय शैक्षणिक,अर्थिक आदी क्षेत्रात संधी दिली नाही. सातत्याने मातंग समाजावर अन्याय आणि अत्याचारच झालेला आहे.त्यामुळे अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण (अ,ब,क,ड) करून मातंग व तत्सम समाज व इतर जातींना न्याय मिळावा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावी यासाठी परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली.लहूतीर्थ,संगमवाडी, पुणे ते सुमननगर, मुंबई येथे दि.१९ते २० जुलै या कालावधीत दवंडीयात्रा काढण्यात आली आहे.या दवंडी यात्रेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे तसेच लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून दहा हजार समाज बांधव दि.२० जुलै २०२३ रोजी होणाऱ्या मुंबई येथील मोर्च्याला घेऊन येण्याचे ठरले.मातंग समाजाने ‘जय लहुजी’ हे अभिवादन करावे.नांदेड, लातूर जिल्ह्यातील मातंग समाजातील बुद्धिजीवी लोकांनी आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन आरक्षण चळवळीविषयी समाजात जाणीवजागृती करावी असे ठरले.या परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रातील आमदार आणि खासदार महोदयांना सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन देऊन येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या विषयावर चर्चा घडवून आणणे आणि चर्चेत सहभागी होणे याविषयीचे निवेदन देण्याचे ठरले.जे जे लोकप्रतिनिधीं सहभागी होतील त्यांना सकल मातंग समाज निवडणुकीत मतदान करण्याचे ठरले. जे जे लोकप्रतिनिधीं विधीमंडळात आरक्षणाच्या चर्चेत सहभागी होणार नाहीत अशा लोकप्रतिनिधींना मातंग समाज निवडणुकीत सहकार्य करणार नाही असे ही यावेळी ठरले. यावेळी आ. जितेश अंतापूरकर विचार मांडताना म्हणाले की,मातंग समाजाला अनुसूचित जाती आरक्षणाचे (अ,ब,क,ड) वर्गीकरण व्हावे.बार्टीच्या धर्तीवर आर्टीची निर्मिती केली पाहिजे तरच समाजाला न्याय मिळू शकतो.यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.या परिषदेत चंदन पाटील नागराळकर, प्राचार्य राजकुमार मस्के, प्रा.पंडित सूर्यवंशी,केशव शेकापूरकर, उद्योजक दिलिपजी गायकवाड होरंडीकर, बाबुराव आंबेगांबे,राजू कसबे औसा,मामा गायकवाड कंधार, नितिन तलवारे मुखेड, बालाजी सांळुके लातूर मनोहर सूर्यवंशी आदींनी यावेळी विचार व्यक्त केले. या परिषदेचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केले तर ठरावाचे वाचन प्रा.शिवाजीराव देवनाळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य गोविंद भालेराव यांनी केले तर आभार प्रेम तोगरे यांनी मानले.या आरक्षण परिषदेला नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.