मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी

उदगीर / प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उदगीर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे एक दिवशी आंदोलन दिनांक 13/0 9/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे करण्यात आले.
या आंदोलनासाठी छावा, मुस्लिम आरक्षण समिती उदगीर व पॅंथर या संघटनांनी पाठिंबा दिला.
या वेळी आंदोलनकर्ते जितेंद्र मादलापूरकर, देवाभाऊ घंटे,बाबासाहेब एकुरकेकर,राजकुमार माने,बालाजी कसबे, निवृत्ती सांगवे, गणेश बिरादार, रामेश्वर मोरे, शंकर मोरे, अंबादास किने,मदने विमल, डॉ. अंजुम कादरी, नेत्रगावकर महेंद्रकुमार, निवृत्ती भाटकुळे, कटारे सूर्यकांत, दत्ता पाटील,बिरादार बालाजी, शिल्पा इंगळे, शिवगंगा बिरादार, लक्ष्मी बिरादार ,मीरा माने, बालाजी कारभारी, अभिजीत पाटील, शिवाजी करकाळे,आशिष पाटील, इब्राहिम नबीजी, नितीन सावंत, शेख मोहियूदिन, मौलाना फारुक , फायाज डांगे ,इरफान शेख ,मुसा पठाण, गोपाळ पाटील, राम रावणगावे, रामदास पाटील, दशरथ होळसमुद्रकर ,प्रशांत बिरादार, राहुल आतनुरे, डॉ.निवृत्ती तीरकमटे, सुनील पाटील, अहमद सरवार,मौलाना नौशाद अली, शिवाजी कांबळे , सिध्देश्वर लांडगे,आकाश शिंदे, नर्सिंग उदगीरे, अजित शिंदे, आकाश सावळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp