दि.29/08/2023 रोजी सात सैलानी,गांधीनगर उदगीर येथे भीमशक्ती लातूर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन मा.कल्याणजी पाटीलसाहेब उदगीर तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले. या उदघाटन प्रसंगी प्रमूख पाहूने म्हणून भीमशक्तीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.दिनकरदादा ओंकार साहेब,मराठवाडा अध्यक्ष संतोषजी भिंगारे,महाराष्ट्र सरचिटणीस भाई नवगीरे,महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयजी सूखदेव व प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.उदघाटना नंतर लागलीच नालंदा बूध्द विहार उदगीर येथे लातूर व उसमानाबाद जिल्हा प्रमूख कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली भीमशक्तीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा बैठक घेऊन पूढील काळातील कार्याबाबत सूचना केल्या संबंधित बैठकीचे औचित्य साधून आयोजक जिल्हाध्यक्ष संजय काळे व उदगीर भीमशक्ती पदाधीकार्यानी उदगीर येथील वेगवेगळ्या सामाजिक कार्यांत अग्रेसर असणार्या नेत्यांचे सत्कार करून त्यांच्या कार्यांचा गौरव करण्यात आला.सुत्र संचलन मा.आविनाशजी गायकवाड सरांनी व आभार मा.श्रीनीवासजी ऐकूर्केकरसरांनी केले कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गोविंदजी गायकवाड व बूध्दसंदेश कांबळे व भीमशक्ती पदाधीकार्यानी परिश्रम घेतले.