जालना जिल्हयातील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी देवणी कडकडीत बंदचे सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन
देवणी / प्रतिनिधी : जालना जिल्हयात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी देवणी कडकडीत बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्हयातील अंतरवाली गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता उपोषणाला बसलेल्या समाज बांधवाला पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ या घटनेचा निषेध करण्यासाठी समाज बांधवांची व्यापक बैठक घेण्यात आली. यामध्ये मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावागावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीला अनुभवी पदाधिकारी यांनी याविषयी मार्गदर्शन करून जालना जिल्हयातील घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी देवणी येथे कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद राहणार आहेत, असे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशन,देवणी यांना देऊन नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
