पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मरण केल्यानंतर समोर संपूर्ण साहित्य दिसते पवित्र अपवित्र या शब्दाने मानवी समूह मेला होता मेलेल्या समूहाला जिवंत करण्याचे काम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने केले.
अण्णाभाऊ चा संघर्ष हा थक्क करणारा असून त्यांचा गौरव रशियात केला जातो परंतु आपण त्यांना समजून घेऊ शकलो नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा प्रसार व प्रचार बार्टी करत असून बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना वाचले पाहिजे !
अण्णाभाऊचे साहित्य हे उपेक्षित वंचित समूहाला लढण्याची प्रेरणा देते उपेक्षित वर्गातल्या माणसाला त्यांनी नाईक बनविले असे मत बार्टी संस्थेचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.


ते पुढे बोलताना म्हणाले की, भारताला अखंड जोडण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीने केले असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महार – मातंग परिषदा घेऊन या समुहाला जागृत केले.
अण्णाभाऊनी ” जग बदल घालुनी घाव मज सांगुनी गेले भिमराव ” हा संदेश दिला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तत्वासमोर ते नतमस्तक झाले अण्णाभाऊना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबदल पराकोटीचा आदरभाव होता पंरतु तो आदरभाव पुढच्या पिढीमध्ये दिसुन येत
नसल्याची खंत डॉ चव्हाण यांनी व्यक्त केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे येथे मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भंदन्त रत्नदिप, औरंगाबाद, कार्यालय अधिक्षक श्रीमती प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, अनिल कांरडे, रविंन्द्र कदम, वॄषाली शिंदे, लेखाधिकारी योगिता झानपुरे, राजेंद्र बरकडे, कार्यालय अधिक्षक डॉ संध्या नारखडे, प्रज्ञा मोहिते, सचिन जगदाळे, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, महेश गवई, सुमेध थोरात, डॉ सारिका थोरात, शुभांगी सुतार , भंदन्त बोध्दीरत्न , औरंगाबाद, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे, सोलापुर यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
सुत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केले.
आभार चंद्रदिप मुजमुले यांनी मानले.