वलांडी / प्रतिनिधी(शादुल बौडिवाले) : एक तास गावासाठी, अंबानगरच्या तरुणांचा नववर्षी स्तुत्य उपक्रम आपले गाव स्वछ,सुंदर आणि हरित करण्यासाठी अंबानगर ता. देवणी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन एक तास गावासाठी हा उपक्रम राबवला असून अंबानगर गाव हरित करण्याचा संकल्प केला आहे.
नवीन वर्षाचे औचित्य साधून गावातील नवतरुणांनी गावातील स्मशानभूमी, मारुती मंदिर, सर्व गल्ली व मुख्य रस्त्याच्या दुतरफा नारळ आणि आंब्याची झाडे लावली आहेत त्या झाडांना जगवण्यासाठी संरक्षक जाळी बसवून वेळोवेळी घागरीने पाणी देऊन त्या झाडांचे संगोपन केले आहे.
दर पंधरा दिवसांनी हे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवले जाते. यात गणेश सुरवसे, रामेश्वर खताळ, राज सुरवसे, शेख अहमद इत्यादि तरुणांचा सहभाग होता.सदरील उपक्रम गेल्या दोन महिन्यापासून चालू असून टप्प्यानुसार गावातील वृक्षाची संख्या वाढवी आणि आपले गाव स्वच्छ, सुंदर, आणि हरित व्हावे या प्रामाणिक इच्छेने हे तरुण काम करीत आहेत.


