एक महिन्यापासून महाऑनलाइनचे सर्वर ठप्प

विद्यार्थ्यांसह लाभार्थीची हजारो प्रमाणपत्रे रखडली “

देवणी तहसील कार्यालयात विद्यार्थी लाभार्थी दररोज खेटे मारून जात आहेत

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी — महा-ई सेवा सुविधा आणि आपले सरकार सेवा केंद्रांत विद्यार्थी आणि लाभार्थीची अपलोड केलेली हजारो प्रमाणपत्रे महाऑनलाइनचे सर्व्हर ठप्प झाल्यामुळे गेली पंधरा दिवसांपासून अडकून पडली आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज दाखल केले होते. ते येण्याची वाट पाहत
असतानाच शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली. त्यात पहिल्या घोषणेनुसार उत्पन्न, रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र आदींची आवश्यकता असल्याचे नमूद केल्यामुळे हजारो महिलांनी राज्यात अर्ज दाखल केले. त्यामुळे सर्व्हरवर लोड येऊन तहसीलच्या ‘ऑनलाइन डेस्क क्रमांक एक’ वरून संचिका पुढे जाणे थांबून गेले.नोकरभरती, शैक्षणिक प्रवेशाला अडथळा ‘लाडकी बहीण’ योजनेचे निकष नंतर बदलून ३१ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख घोषित केलीअसली तरीही महिलांनी अगोदर दाखल केलेल्या ऑनलाइन अर्जामुळे अनेक तरुण नोकरभरती आणि दहावी, बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुदतीच्या आत प्रमाणपत्रे न मिळाल्यामुळे शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
केंद्रचालक-अर्जदारांत वाद
अनेक ठिकाणी शासनाची प्रमाणपत्र देण्याची सात दिवसांची मुदत उलटून गेल्यामुळे अर्ज दाखल केलेले अर्जदार आणि महा-ई-सेवा केंद्रचालक यांच्यात वाद होत आहेत. केंद्रचालकदेखील हतबल झाले आहेत.महाऑनलाइनच्या एकाच सर्व्हरवर शासनाच्या विविध योजनांच्या संचिका ऑनलाइन करण्यात येतात. सर्व्हरवर दिवसभरात कमाल ६० हजारांपर्यंत संचिका ऑनलाइन करण्याची क्षमता असताना त्यात ‘लाडकी बहीण’ साठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांच्या अर्जाचा दररोज महाराष्ट्रातून प्रतिदिन दीड ते दोन लाख संचिकांचा बोजा पडल्यामुळे सर्व्हर ठप्प झाले आहे. आमची टीम त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व्हरची क्षमता शासनाने वाढवून दिल्यास अडचण नक्कीच दूर होईल माझ्या मुलीच्या दहावी नंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मी मागील महिन्यात ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळण्यासाठी’ महा-ई-सेवा केंद्रात अर्ज दाखल केला होता. मात्र, शासनाने ते उपलब्ध करून न दिल्यामुळे माझ्या मुलाचे प्रवेश रखडले आहे.पत्नी, आईचे उत्पन्न रहिवासी यादुल आजेमखा पठाण देवणी खुर्द दरोज तहसिल कार्यालयात जाऊन रिकाम्या हाताने परत येत आहेत हे चिंतेचे बाभ ठरले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp