खास बातमी… विशेष बातमी..
एसटी महामंडळाच्या या २६ योजना तुम्हाला माहीत आहेत का?
एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना १७ मार्च २०२३ पासून (शुक्रवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. याप्रमाणेच एसटी महामंडळाच्या इतरही योजना आहेत ज्याचा फायदा पात्र नागरिक घेऊ शकतात. चला तर जाणून घेऊ या योजमा नेमक्या कोणकोणत्या आहेत?
१) स्वातंत्र्यसैनिक व त्याच्यासोबत एका साथीदाराला या सवलतीत वर्षभर मोफत प्रवास करता येतो. ही सवलत साधी बस निम आराम बस आराम बस व वातानुकूलित बस या सर्वच प्रकारच्या बस मध्ये शंभर टक्के सवलत लागू आहे.
२) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक त्याच्या साथीदाराला यामध्ये वर्षभर मोफत प्रवास करता येतो या व्यक्तीला साधी बस निवारण बस व आराम बस या बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
३) शासन अधिस्वीकृतीधारक म्हणजेच पत्रकार – शिवशाही शयन बस 8000 km पर्यंत मोफत 100% प्रवास करता येतो. यामध्ये साधी बस नीम आराम बस शिवशाही बस या सर्वच बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
४) पाचवी सवलत आहे राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी यामध्ये या नागरिकांना साधी बस निम आराम बस आराम बस वातानुकूलित बस व शिवशाही बस या सर्वच बसमधून 50 टक्के मोफत प्रवास करता येतो म्हणजेच शंभर रुपये जर तिकीट असेल तर फक्त पन्नास रुपये तिकीट भरावे लागेल.
५) राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना यामध्ये साधी बस नीम आराम बस वातानुकूलित बस व शिवशाही बस या सर्वच बसमधून शंभर टक्के प्रवास मोफत करता येतो.
६) विद्यार्थी मासिक पास सवलत विद्यार्थ्यांना साध्या बस मधून ६६. ६७ टक्के सवलत देण्यात आली आहे यामधून विद्यार्थी या सवलतीच्या टक्के एवढे मोफत प्रवास करू शकतात.
७) अंध व अपंग व्यक्तींसाठी यामध्ये साधी बस व नीम आराम बस या बसमधून अपंग व अंध व्यक्तींना 75 टक्के सवलत आहे व शिवशाही बस मधून 70 टक्के मोफत प्रवासासाठी सवलत दिली आहे.
८) टक्के वरील अंध व अपंग व्यक्ती तसेच त्यांच्या मदतनीस व्यक्तीसाठी या सवलतीत साधी व निम आराम बस मधून 50% मोफत प्रवास या व्यक्तींना करता येतो व शिवशाही बसमधून 45% मोफत प्रवास या व्यक्तींना करता येतो.
९) क्षयरोगी व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी या सवलतीत साध्या बस मधून क्षयरोगी व्यक्तीसाठी 75 टक्के मोफत प्रवास करता येतो.
१०) कर्करोगी व्यक्तीसाठी या सवलतीत वैद्यकीय उपचारासाठी साध्या बस मधून 75 टक्के मोफत प्रवास करता येतो.
११) कुष्ठरोगी व्यक्तीसाठी या सवलतीत वैद्यकीय उपचारासाठी साध्या बस मधून कुष्ठरोगी व्यक्तीला 75 टक्के मोफत प्रवास करता येतो.
१२) राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी या सवलतीत साध्या बस मधून 33.33% मोफत प्रवास या स्पर्धकांना करता येतो.
१३) विद्यार्थी जेवणाचे डबे नेण्यासाठी या सवलतीत साध्या बस मधून शंभर टक्के मोफत डब्यांची ने – आण करता येते.
१४) अर्जुन द्रोणाचार्य दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंसाठी या सवलतीत साधी बस नीम आराम बस आराम बस व वातानुकूलित बस या सर्वच बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
१५) आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांच्यासाठी या सवलतीत वर्षभर मोफत प्रवास करता येतो साधी बस निम आराम बस व आराम बस या सर्व बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
१६) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार ती व त्यांच्या एका साथीधाराला या सवलतीत साधी बस नीम आराम बस व आराम बस या सर्व बसमधून वर्षभर शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
१७) पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेल्या एका वारकरी दांपत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास या सवलती मधून करता येतो या सवलतीत साधी बस निम आराम बस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
१८) एकविसावी सवलत आहे विधानमंडळ सदस्य व त्यांच्या एका साथीदाराला या सवलतीत साधी बस निम आराम बस आराम बस वातानुकूलित बस व शिवशाही बस या सर्वच प्रकारच्या बसमधून एक वर्षभरासाठी शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
१९) माझी विधानमंडळ सदस्य व त्यांच्या एकाच साथीदाराला या सवलतीत साधी बस निम आराम बस आराम शिवशाही बस या सर्वच प्रकारच्या बसमधून वर्षभर शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
२०) रेस्क्यू होम मधील मुलांना वर्षातून एकदा सहली करिता. या सवलतीत साध्या बस मधून 66.67% मोफत प्रवास करता येतो.
२१) मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी या सवलतीत साध्या बस मधून 66.67% मोफत प्रवास या विद्यार्थ्यांना करता येतो.
२२) अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांच्या एका साथीदारासाठी या सवलतीत साधी बस आणि नीम आराम बस या बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
२३) सिकलसेल रुग्णासाठी दुर्धर आजार रुग्णासाठी डायलिसिस रुग्णासाठी व हिमोफेलिया रुग्णासाठी या सवलतीत साधी बस व नीम आराम बस या बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
२४) राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तीसाठी या सवलतीत साधी बस नीम आराम बस व आराम बस या बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो.
२५) कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत लाभार्थी सहा महिन्यापर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता. या सवलतीत साध्या बस मधून 66.67% मोफत प्रवास करता येतो.
२६) शैक्षणिक खेळासाठी या सवलतीत साध्या बस मधून 50 टक्के मोफत प्रवास करता येतो.
महाराष्ट्रातील जनता ही एसटीला आपली जीवन वाहिनी म्हणूनच पाहत असते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सवलती एसटी महामंडळ महाराष्ट्रातील जनतेसाठी गेल्या कित्येक वर्षापासून देत आहे.