गोर गरीब वृद्धांना ब्लॅंकेट तर महिलांना प्रेशर कुकर चे वाटप.

देवणी प्रतिनिधी—
सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात.भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे म्हणून देवणी येथील ओम गणेश मंडळ येथे दि.२६ सप्टेंबर रोजी गणेश उत्सवानिमित्त दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कट्टेकर व प्रमुख पाहुणे म्हणून म.नी.प्र सिद्धलिंग स्वामीजी,देवणी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, देवणी पोलीस उपनिरीक्षक कत्ते साहेब, मल्लिकार्जुन मानकरी,राहुल आंबेसंगे,आनंद जीवने,रमेश कोतवाल,कुशोर निडवंचे,हावगिराव पाटील,अमर पाटील,मनोहर पटणे, काशिनाथ गरीबे,शेषेराव मानकरी,शेखर कुमठेकर हे होते.या रांगोळी स्पर्धेत देवणी शहरातील विविध शाळेतील एकूण ४१ विध्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.या रांगोळी स्पर्धेत प्रथम बक्षीस २०००,द्वितीय बक्षीस १००० व तृतीय बक्षीस ५०० रु असे पारितोषिक ठेवण्यात आले होते.या रंगोळीस्पर्धेत ५ वी ते ८वी व ९ वी ते १२ असे दोन गट करण्यात आले होते.५वी ते ८वी मधून प्रथम अक्षरा जीवने, द्वितीय आकांक्षा धनुरे व तृतीय सृष्टी स्वामी तसेच ९ वी ते १२ मधून प्रथम भक्ती भंगे,द्वितीय स्नेहा तेलगावे,व तृतीय विजयालक्ष्मी दवनहीप्परगे या सर्वांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.व तसेच कार्यक्रमात उपस्थित गोरगरीब वृद्धांना ब्लॅंकेट आणि महिलांना प्रेशर कुकर चे वाटप करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कट्टेकर बोलताना म्हणाले की गणेश विसर्जन च्या वेळी जे पण नियम निगतील त्या नियमाचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे व महिलांसोबत, तरुणीसोबत जर काही चुकीची वर्तवणूक आणि कसल्याही प्रकारचा गैरवर्तन होत असेल कधीही पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार नोंदवू शकता.यावेळी या बक्षिसे वाटपात मनसुरे सर,ओम गणेश मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी, पोलीस स्टाफ व कर्मचारी, मनसुरे सर ,पत्रकार जयेश ढगे,गावातील लहान थोर ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp