प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कशी घ्यावी लागेल..
काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ? १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.
❇️ योजनेचा उद्धेश ?
योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ टक्के व्याजदरासह पहिल्या टप्यात १ लाख रु. तर दुसऱ्या टप्यात २ लाख रु. चे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.
❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :
१. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे
२. पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे
३. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आयडी कार्ड प्रदान केले जाणार आहे
४. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे ई व्हाउचर.
५. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह पहिल्या टप्यात एक लाख तर दुसऱ्या टप्यात २ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.
कोणाला लाभ घेता येणार आहे
✔️ सुतार
✔️ लोहार
✔️ सोनार (दागिने कारागीर)
✔️ कुंभार
✔️ न्हावी
✔️ माळी (फुल कारागीर)
✔️ धोबी
✔️ शिंपी
✔️ गवंडी
✔️ चर्मकार
✔️ अस्त्रकार
✔️ बोट बांधणारे
✔️ अवजारे बनवणारे
✔️ खेळणी बनवणारे
✔️ कुलूप बनवणारे
✔️ विणकर कामगार
📄 आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. उत्पन्न प्रमाणपत्र
४. जात प्रमाणपत्र
५. पासपोर्ट सा. फोटो
६. बँक पासबुक
७. मोबाईल नंबर