देवणी / प्रतिनिधी : देवणी (खु.) ता. देवणी जि.लातूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप पाटील व मित्र परिवाराच्या वतीने भारत देशाचे
माजी कृषिमंत्री मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील एकूण 40 संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना नक्ष क्रिकेट क्लब उदगीर व क्रिकेट क्लब यांच्यामध्ये रंगला होता अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात नक्ष क्रिकेट क्लब उदगीर या संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले..
विजेत्या संघास संदीप पाटील यांच्या वतीने 21 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक तसेच उपविजेत्या संघास 11 हजार रुपये चे पारितोषक व चषक देण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे, देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल कांबळे,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्ता चाळकापुरे मनोहर पाटील देवनी ( खु ) चे सरपंच यशवंत कांबळे , उपसरपंच विठ्ठल शिगंडे , ग्रामपंचायत सदस्य महादेव नाना रणदिवे , प्रभू काकनाळे , रामराव म्हैत्रे , अर्जुन मुराळे , तानाजी चामे, राजू गरड, श्रीशांत माकणे व सर्व कार्यकर्ते व गावकरी मित्र मंडळ उपस्थित होते ..
