कृषी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा- हाकनकवाडी गावात 70 ते 80 टक्के शेतकऱ्यांनी केली टोकन पद्धतीने सोयाबिन लागवड
उदगीर / प्रतिनिधी : मौजे हकनकवाडी तालुका उदगीर येथे कृषी विभागाच्या अथक प्रयत्नाने 70 ते 80 टक्के शिवारावर सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रम घडवला आहे.
गतवर्षी गावामध्ये केलेल्या विविध कार्यक्रम जसे शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिके, गाव बैठका, शेतकरी प्रशिक्षण यामध्ये कृषी सहाय्यक श्री सुनील चव्हाण यांनी व कृषी पर्यवेक्षक फुले पद्माकर, मंडळ कृषी अधिकारी राधिका चिर्के व तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रबोधनाचा फलित म्हणून यावर्षी 70 टक्क्यांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड करून तालुक्यातील विक्रम प्रस्थापित केला आहे. या गावातील प्रगतशील शेतकरी माधव आश्रोबा फड यांच्या सोयाबिन टोकन प्रक्षेत्रास भेट देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर रक्षा शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र काळे, लातूर कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण गुट्टे, प्रकल्प संचालक आत्मा लातूर शिवसाम लाडके, तालुका कृषी अधिकारी उदगीर संजय नाबदे, मंडळ कृषी अधिकारी पद्माकर फुले, पंचायत समिती कृषी अधिकारी बालाजी केदासे,कृषी सहाय्यक गोविंद तोलसरवाड, माजी कृषी सहाय्यक हाकनकवाडी सुनील चव्हाण, कृषी सहायक अशोक आरणे, दिलीप कबाडे, संभाजी डावळे, दर्शन केंद्रे, सतीश भांडेकरी, गुंडरे, प्रशांत गायकवाड, दर्शन केंद्रे व बीटीएम आत्मा नितीन दुरुगकर यांनी भेट देऊन प्रातिनिधिक स्वरूपात नरसिंग माणिक मुंडे, प्रकाश बाजीराव फड, माधव आश्रोबा फड, दत्ता हब्बू पवार व कृषी मित्र विजयकुमार माणिक केंद्रे या शेतकऱ्याचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अशीच प्रेरणा घेऊन इतर कृषी कर्मचाऱ्यांनी ही या पद्धतीचे काम करावे असे आवाहन यावेळी केले.
मागील गतवर्षीपासून तालुक्यात नव्याने आलेल्या गोगलगाय किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत प्रबोधनात्मक सुरू केलेल्या फिरत्या चित्ररथास झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी देवर्जन सुनील देवनाळे मंडळ कृषी अधिकारी वाढवणा राजेश मुळजे कृषी पर्यवेक्षक फारुख शेख, लिंबराज मुळे व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व परिसरातील प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.



