देवणी : दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी रसिका शैक्षणिक संकुलात सहकार महर्षी मा श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांचे आगमन. कै रसिका महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन सोहळा सहकार महर्षी मा श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्याचे योजिले आहे. जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे अध्यक्ष मा श्री गोविंदराव भोपणीकर व संस्थेचे सचिव मा श्री गजानन भोपणीकर यांच्या शैक्षणिक सेवेतून या शैक्षणिक भव्य इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. तरी आपल्या सर्वांची उपस्थीती उल्लेखनीय असेल.


