
कै.रसिका महाविद्यालयाच्या खेळाडूंचे विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत यश
लातुर –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धा दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीत संपन्न झाल्या. या स्पर्धेत 800 मीटर व 1500 मीटर धावणे स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या कांबळे अंकिता या खेळाडूने विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तसेच 5 किलोमीटर धावणे स्पर्धेत कांबळे निकिता या खेळाडूने विद्यापीठातून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. 4×400 मी रिले स्पर्धेत निरुडे अभिजीत याने विद्यापीठातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन चामले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष
मा. श्री .गोविंदरावजी भोपणीकर साहेब, सचिव मा.श्री गजाननजी भोपणीकर साहेब व सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तसेच प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.