कै. रसिका महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
देवणी / प्रतिनिधी :
कै.रसिका महाविद्यालय, देवणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री. दयानंद रणदिवे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.