देवणी / प्रतिनिधी(डॉ.प्रा.पुरूषोत्तम मोरे) :
कै.रसिका महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नंदकिशोर पदकोंडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी संस्थेचे सचिव मा.श्री. गजाननजी भोपणीकर, रामभाऊ भोपणीकर, सौ. कुशावर्ता बेळे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मी शिक्षण घेत असताना या महाविद्यालयाने मला मोलाचे सहकार्य केले. तसेच या महाविद्यालयात बी. एस्सी. चे शिक्षण घेताना मला स्पर्धा परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यामुळे मी हे यश संपादन करू शकलो, अशी प्रतिक्रिया यावेळी नंदकिशोर पदकोंडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp