देवणी
कै.रसिका महाविद्यालय देवणी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम मोरे यांनी केले.श्री सुमित मोहिते यांनी गारद गर्जना करून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ शिवाजी सोनटक्के यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
