
कै. रसिका महाविद्यालय देवणी येथे मतदार जनजागृती अभियान
देवणी
कै.रसिका महाविद्यालय देवणी येथे मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले व सोबतच आपले कुटुंब व आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रेरित करावे याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोपाल सोमानी यांनी केले. तसेच उपप्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के व प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना रिल्स पथनाट्य व विविध माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.