देवणी / प्रतिनिधी : कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने कोरोना (covid-19 ) लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन देवणीचे तहसीलदार मा. श्री. सुरेश घोळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, ग्रामीण रुग्णालय देवणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिदास बिरादार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक प्रा. डॉ. प्रशांत भंडे, केंद्र सहाय्यक प्रा. डॉ.गोपाल सोमाणी उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार श्री. सुरेश घोळवे यांनी कोरोना लसीकरणाचे महत्त्व व कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती सविस्तरपणे सांगितले. या शिबिरात विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना कोवीशिल्ड, कोव्हॅक्शीन या लसीचा पहिला / दुसरा डोस देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी केले. आभार प्रा. डॉ गोपाल सोमाणी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp