

(विकास कांबळे: वृत्त प्रतिनिधी धाराशिव)
धाराशिव जिल्ह्यातील निसर्ग रम्य गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गडदेवदरी ता.जिल्हा धाराशिव येथे सौ. मोहरबाई मरगा आढाव यांची महिला सरपंच पदी निवड झाली आहे.
या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राणा जगजितसिंह सिंह पाटील यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत. निवडी वेळी गावातील सर्व नागरिक माजी सरपंच , गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.मनोज रणखांब , श्री.भाऊसाहेब खताळ, श्री.दत्तात्रय आढाव , श्री. आण्णा आढाव श्री.शौकत मुजावर श्री.दिनेश डांगे श्री.अशोक आढाव श्री.विकास आढाव तसेच तलाठी श्री.गायकवाड आणि गावचे ग्रामसेवक व महिला नागरिक व ग्रामपंचायत सदस्य या वेळी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात नूतन सरपंच आढाव यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पदभार स्वीकारल्यानंतर भविष्यात गावात विविध विकास कामांचे आयोजन व नियोजन तसेच गावामध्ये पर्यावरण पूरक वातावण निर्मिती साठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण करण्याचे , गावातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचे , सेंद्रिय शेतीच्या नव संकल्पना राबवणे व गाव विकासाभिमुख विविध योजनातून समृध्द व आदर्श करण्याचे वचन या वेळी सरपंच यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.विकास कांबळे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मांडले व सदर सत्कार समारंभ कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रम नियोजन यशस्वीतेसाठी श्री. उत्तम कांबळे, श्री.विशाल आढाव , श्री.अविनाश भालेराव, श्री.ऋषिकेश भोसले यांचे सहकार्य लाभले.