१९५० ला झाले भारताचे संविधान लागू..
पण संपूर्ण भारतीय नाहीत त्या बाजू?..!
‘जय संविधान’ अभ्यासून हेही म्हणतात लाजू- लाजू !
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला!
कधी हा समाज जागणार?
अजून किती वाट बघावी लागणार?
महापुरुषांच्या विचारांवर आपण कधी वागणार?
मी बौध्द विचारांचा आहे, हे सांगायला तू अजून किती लाजणार?
तथागत बुद्धांनी शिकविली शांती,
शिवरायांनी घडविली रयती,
जोतिबांनी केली शिक्षणासाठी क्रांती,
बाबासाहेबांनी दिले संविधान हाती!
पण अजूनही आपल्या विचारांची आहे माती!
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला!
आजची पिढी विसरली काय असतात कष्ट!
मतदानाच्या गैरफायदयाने होतंय सगळ भ्रष्ट!
पुढच्या पिढीला काय सांगणार विकासाची गोष्ट??
विचार करा……
शिकण्याचा अधिकार नव्हता तुला मुली..
त्यांच्याच कष्टाने शिक्षणाची दारे झाली खुली..
त्यांच्या कष्टाची जाण विसरून अजूनही बसतेस चुली…
जाण असुदे तुला जरा माय माझी!
खरचं सोपं नव्हतं… लढून मारणं बाजी!
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला!
आर्ध्या जनतेला फरक कळला नाही…
गणतंत्र आणि स्वातंत्र्य मधला…
आतातरी विचार बदला…
इतिहासाची पाने चाळा..
त्याशिवाय नाही होणार विचार गोळा…
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला…
समाज सेवेसाठी, कल्याणासाठी त्यांनी सोडली त्यांची झोप!
वाटलं होत माझा समाज घेईल झेप!
पण राहून गेलं पाणी द्यायचे आणि तसच वाळले विचारांचे रोप!
त्यांना होती आपल्यावर खूप आस…
आपल्यातही होता खूप ध्यास…
तरी स्वतःशी रोज सांगतो.., उद्यापासून करेल नक्की अभ्यास…!
तसाच उरून मागे सुटतो परिवर्तनाचा घास!!
मानवा, विचार स्वतःला…
खरचं घडलास का रे तू?
वाईट विचार सोडले का तू?
स्वतःचा मार्ग शोधला का तू?
महापुरुषांचे कष्ट, स्वप्न समजलास का तू?
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला!!
आताही वेळ आहे… बघ स्वतःला शोधून…
त्यांचे कष्ट नाही बघता येणार मोजून…
नको जाऊ देऊ असं सप्न कोमेजून…
सुविधा मिळतात, तर घे इतिहास वाचून….
व सत्य बदल आन… कष्ट करून…
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला…
कळलंच नाही, तिरंगा कधी वेगळा झाला…
भगवा, पांढरा, हिरवा, निळा… वेगवेगळे झाले…
अरे मानवा! खूप कष्ट आणि वर्ष लागली होती ती रंग एक करायला…
नका टाकू ते badlun…
वेगळ केल्याने नाही येणार बदल घडून….
विकास, प्रगती सगळंच.. राहील अडून..!
गणतंत्र दिवस आला व तसाच निघूनही गेला….!
आतातरी उठ… शिक…
नको मागू कशाचीच भिक…
वेळ लागुदे… पण नक्कीच होशील मोठा..!
फक्त वागू नकोस कधीच खोटा….!
कवितेच्या माध्यमातून विचार व खरी परिस्थिती माडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे… कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी…
“जय भारत, जय संविधान “
- प्राजक्ता पांडुरंग कलंबरकर