लातुर :- अतिरिक्त एमआयडीसी हरंगुळ (बु.) तालुका जिल्हा लातूर येथील चकोते ग्रुपच्या श्री. गणेश बेकरी प्रायव्हेट लिमिटेड लातूर युनिट मध्ये शेकडो महिला व पुरुष कामगार मागच्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत.
या कामगारांचा त्यांच्या पगारीतून पीएफ व आरोग्य विम्याच्या नावाखाली दर महिन्याला पैशाची कपात केली जात होती. तसेच दहा वर्षापासून काम करत असूनही कोणत्याही कामगारांना कंपनीतर्फे ओळखपत्र दिले जात नव्हतं. कामगारांच्या मागण्या अगदी रास्त होत्या व नियमानुसारच होत्या तरीही कंपनी प्रशासन कामगारांच्या मागण्या मान्य करत नव्हते.
सदरची बाब कामगारांनी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांना सांगितल्यानंतर त्यांनी कंपनीचे मॅनेजर यांना लोकाधिकार संघाचे पत्र देऊन कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशा सूचना केल्या.
लोकाधिकार संघाचे पत्र मिळाल्यानंतर गणेश बेकरी कंपनी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत कामगारांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करत आहोत असे पत्र कामगारांना व लोकाधिकार संघाला दिनांक ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी दिले आहे.
कामगारांचे रोजचे पोट कंपनीवर चालते त्यामुळे लोकाधिकारप्रमुख बोलत असताना म्हणाले की गणेश बेकरीची प्रगती झाली पाहिजे त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या कामगारांची ही प्रगती झाली पाहिजे.
कामगारांना कुठलीही अडचण असो त्यांनी लोकाधिकार संघाशी संपर्क करावा, लोकाधिकार संघ सदैव आपल्या सोबत राहील अशी ग्वाही यावेळी लोकाधिकारप्रमुख पनाळे. यांनी दिली.
लोकाधिकार प्रमुखांनी कामगारांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कामगारांना न्याय मिळाला, त्यामुळे सर्व कामगारांनी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांचा कंपनीमध्ये सत्कार करून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp