देवणी / प्रतिनिधी :
उदगिर तालुक्यातील गुडसुर
येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साजरा करण्यात येतो. याप्रसंगी गावात दरवर्षी उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. अध्यात्म, समाजप्रबोधन आणि एकोपा या उद्देशाने सुरू केलेल्या ग्रामोत्सवाचे या कीर्तन सप्ताहात आठ दिवस वारकरी संप्रदायातील विशेष नावलौकिक असलेले कीर्तनकरांच्या कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह. भ. प. भागवत शिरवळकर, यांच्यासह श्री ह.भ.प.निवृत्ती महाराज हल्लाळीकर, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर एकुर्केकर , श्री.ह.भ.प. युवराज महाराज करक्याळकर श्री.ह.भ.प.सुनिल महाराज, श्री.ह.भ.प.सतिष महाराज कदम,
दरवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील कीर्तनाचा आस्वाद ग्रामस्थांनी घ्यावा. तसेच आठव्या दिवशी गावात व पंचक्रोशीत दिंडीचे (पालखी) आयोजन करण्यात येणार आहे. सगरोळी व परिसरातील भावीक भक्तांनी व समस्त ग्रामस्थ, महिला, तरुण या दिंडीत विठू नामाच्या गजरात तल्लीन व्हावे.आसे आवाहन समस्त गावकरी मंडळी यानी केले आहे ग्रामोत्सवाचा समारोप ह. भ. प. निवृत्ती हल्लाळीकर महाराज यांचे दि,१६/२/२०२२ काल्याच्या कीर्तनाने होणार.या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल रुक्कमीनी मंदिर गुडसुर येथे केले आहे हे साप्ताहिकाचे आयोजक नरसिंग सुर्यवंशी,किरण सुर्यवंशी, ओमकार शिंदे,सौ सुनबाई सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, दिगंबर सुर्यवंशी, नामदेव सुर्यवंशी,जनार्धन सुर्यवंशी, निवृत्ती सुर्यवंशी, बालाजी गोतावले,आदिच्या सहकार्य केले आहे.